RBI: आता RTGS, NEFT साठी बँकांची गरज नाही?

आरबीआयची मोठी घोषणा; आरटीजीएस, एनईएफटी 'पे-वॉलेट'द्वारे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात डिजिटल पेमेंटचा वेग कमालीचा वाढलाय. कोरोना संकटात अनेकजण बँकेत न जाता डिजिटलीच ऑनलाईन सेवा वापरतायत. हे विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकने आर्थिक धोरण समितीच्या आढावा बैठकीत मोठी घोषणा केलीये. आता आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे पैसे पाठविण्यासाठी ग्राहकांना बँकांची गरज लागणार नसल्याचं आरबीआयने म्हटलंय.

हेही वाचा – यावर्षी सर्वाधिक पावसाचा विक्रम, 162 इंच पाऊस

आरटीजीएस, एनईएफटी ‘पे-वॉलेट’द्वारे

रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम आणि नॅशनल इलेक्ट्रीक फंड ट्रान्सफर या दोन सुविधांद्वारे समोरच्या व्यक्तीला काही मिनिटांत पैसे पाठविता येतात. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबतची घोषणा करताना आता या सेवा फक्त बँकाच नाहीत, तर नॉन बँकिंग पेमेंट सिस्टिम ऑपरेटरदेखील देऊ शकणार आहेत. म्हणजेच आता आरटीजीएस किंवा एनईएफटी करायचं असेल तर बँकेची गरज लागणार नाहीये. आरटीजीएस आणि एनईएफटी ही एक सेंट्रलाईज पेमेंट सिस्टिम आहे. मात्र, तरीदेखील तिची व्याप्ती आता वाढविण्यात आलीये. या सेवा प्रीपेड पेमेंट इनस्ट्रुमेंट, कार्ड नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सदेखील देणारेत.

जीडीपी वाढ १०.५ टक्के राहण्याचा अंदाज

आरबीआयने सांगितले की, ही सेवा वाढविल्याने आर्थिक प्रणालीमधील सेटलमेंटची जोखीम कमी करण्यास मदत मिळणारेय. तसंच देशातील डिजिटल व्यवहारांच्या सुविधेमध्ये वाढ होणारेय. सध्या आरटीजीएस आणि एनईएफटी सेवा आरबीआयने मोफत केली होती. 6 जून 2019 मध्ये आरबीआयने हा निर्णय घेतला होता. ही सुविधा आता 24 तास सुरू आहे.

हेही वाचा – Video | कणकिरे-गुळेलीला वादळाचा तडाखा, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्यं

RBI कडून व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेकडून नव्या वित्तीय वर्षातील पहिलं पतधोरण आज (बुधवार) जाहीर करण्यात आलंय. यापूर्वी कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन धोरणात्मक व्याजदर कायम ठेवले जाऊ शकतात, असं एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, २०२२ च्या पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलीये. याशिवाय रेपो दरही ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलेय. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून तेदेखील ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!