RBI कडून 14 बँकांना कोट्यवधींचा दंड

सरकारी ते खाजगी बँकांपर्यंतचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने विविध मानदंडांचं उल्लंघन केल्याबद्दल बंधन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांसह 14 बँकांना आर्थिक दंड आकारला आहे. या 14 बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी बँका आणि एक लहान वित्त बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेनेच जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली.

हेही वाचाः गोवा मुक्तीदिनी बायणा उड्डाणपूल वाहतूकीस खुला

नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) बँक फायनान्सच्या काही तरतुदींचं पालन न करणं, ‘कर्ज-आगाऊ आणि इतर निर्बंध’ यासाठी ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बँकांवर आरबीआयने आकारलेला दंड हा प्रामुख्याने अडचणीत असलेल्या दीवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (डीएचएफएल) आणि त्याच्या गट कंपन्यांसह बँकांच्या व्यवहारांशी संबंधित आहे.

हेही वाचाः भरधाव इनोव्हाची गुरांना धडक! दोन गुरं जागीच दगावली

उत्तर समाधानकारक न मिळाल्यास कारवाई करणार

रिझर्व्ह बॅंकेच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या कंपन्यांच्या गटाच्या खात्यांच्या तपासणीत असं आढळलं की, आरबीआयने दिलेल्या वरीलपैकी एक किंवा अधिक निर्देशांच्या तरतुदींचं पालन करण्यास बँका अपयशी ठरल्या आहेत. तसंच बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदींचं उल्लंघन केलं आहे. यासंदर्भात बँकांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि कारण दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तसंच याचं उत्तर समाधानकारक न मिळाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचाः देशभरातील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवणारा गजाआड

कोणकोणत्या बँकेचा समावेश?

बंधन बँक लिमिटेड

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ महाराष्ट्र

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

क्रेडिट सुइस एजी (Credit Suisse AG)

इंडियन बँक

इंडसइंड बँक लिमिटेड

कर्नाटक बँक लिमिटेड

करूर वैश्य बँक लिमिटेड

पंजाब आणि सिंध बँक

साउथ इंडियन बँक लिमिटेड

स्टेट बँक ऑफ इंडिया

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

‘जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड

हेही वाचाः अभिनेता सलमान खानसह बहिणीविरोधात पोलिसात तक्रार

‘या’ दोन बँकांवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच ‘आरबीआय’ने पंजाब आणि सिंध बँकेवरही सायबर सिक्युरिटीशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली होती. या बँकांना 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेने सायबर सुरक्षा फ्रेमवर्कच्या निकषांचं पालन केलं नाही. या सरकारी मालकीच्या बँकेला 16 मे आणि 20 मे 2020 रोजी काही सायबर घटनांबद्दल माहिती देण्यात आली होती, पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!