बँक ग्राहकांना झटका; ‘एटीएम’मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

1 ऑगस्टपासून नवे नियम;9 वर्षांनंतर एटीएम इंटरचेंज फी रचनेत वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) तब्बल 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारासंदर्भातील नियमावलीत बदल करण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्क वाढविण्यास परवानगी दिली. मात्र पाच वेळा मोफत वापरण्याची सुविधा एटीएम ग्राहकांना सुरू ठेवावी, असं आरबीआयने म्हटलं आहे. पण त्यानंतर प्रत्येक विनाआर्थिक व्यवहारांसाठी 6 रुपये मोजावे लागतील. त्यासोबतच आर्थिक व्यवहारांची फी म्हणजे पैसे काढण्यासाठी आता 15 रुपयांवरून 17 रुपये द्यावे लागणार आहे.

हेही वाचाः गोवा विमानतळावर ‘आयसीएमआर’ने मंजूर केलेल्या चाचण्यांना मान्यता

9 वर्षांनंतर एटीएम इंटरचेंज फी रचनेत वाढ

बिझिनेस स्टँडर्ड्सच्या अहवालानुसार, आरबीआयने तब्बल 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज फी रचनेत वाढ करण्याची परवानगी दिली आहे. सध्या देशभरात एटीएमची संख्या वाढली आहे. त्याच्या सुरक्षेचा आणि देखभाल खर्च लक्षात घेता बँकांना आता अधिक शुल्क घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एटीएम ग्राहकांना लवकरच झटका बसणार आहे.

हेही वाचाः लाखेरेत बायो मेथानिसेशन प्रकल्पाची पायाभरणी

समितीच्या शिफारशींच्या आधारे निर्णय

गेल्या अनेक वर्षांपासून खासगी बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर इंटरचेंज फी ही 15 रुपयांवरून 18 रुपये करा, अशी मागणी करत आहेत. यासंदर्भात येत्या जून 2019 मध्ये भारतीय बँकांच्या असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचाः …तर बेळगावात लॉकडाऊन का?

1 ऑगस्टपासून नवे नियम 

आरबीआयच्या नव्या अहवालानुसार, येत्या 1 ऑगस्ट 2021 पासून आरबीआयने एटीएममधून आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता ही फी 15 रुपयांहून 17 रुपये करण्यात आली आहे. तर बिगर-आर्थिक व्यवहारासाठी 5 रुपयांवरून 6 रुपये केली आहे. विशेष म्हणजे येत्या 1 जानेवारी 2022 पासून बँकांना ग्राहकांकडून 21 रुपये शुल्क घेण्याची परवानगी दिली आहे. सध्या सर्व बँकांना जास्तीत जास्त 20 रुपये शुल्क घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचाः ‘या’ व्यक्तींच्या लसीकरणाला प्राधान्य; अधिकृत परिपत्रक जारी

एटीएम इंटरचेंज फी म्हणजे नेमकं काय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एटीएम इंटरचेंज म्हणजे काय? याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होईल? याची माहिती आम्ही आम्ही तुम्हाला देणार आहोत. समजा तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्ही एसबीआय कार्ड वापरुन पंजाब नॅशनल बँक एटीएममधून पैसे काढलात, तर तुम्हाला एक विशिष्ट फी भरावी लागते. यालाच एटीएम इंटरचेंज फी असे म्हणतात.

हेही वाचाः गुजरात साहित्य परिषदेनं ‘त्या’ कवयित्रीला ठरवलं ‘नक्षली’

ग्राहकांवर काय परिणाम?

याआधी ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी काहीही फी आकारली जात नव्हती. मात्र आता इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढणे हे महागडं ठरू शकतं. तसंच आरबीआयच्या म्हणण्यानुसार ग्राहक आपल्या स्वत:च्या बॅँकेतून प्रत्येक महिन्याला पाच वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतात. तर अन्य बॅँकेच्या एटीएममधून 3 आणि मेट्रो शहरातील एटीएममधून 5 वेळा व्यवहार करु शकता. त्या पुढील प्रत्येक व्यवहारांवर शुल्क द्यावे लागणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!