‘पॅलासिओ आग्वाद’ची डील फायनल; पिंकी रेड्डीने मोजले एवढे कोटी

कायदेशीर अडथळ्यांमुळे मालमत्तेची विक्री पडली होती लांबणीवर; तब्बल 80 कोटी रुपये मोजून केली मालमत्ता खरेदी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः उत्तर गोव्यात कोरीव काम केलेली ‘पॅलासिओ आग्वाद’ ही समुद्राभिमुख मालमत्ता आता जीव्हीके ग्रुपचे उपाध्यक्ष संजय रेड्डी यांची पत्नी पिंकी रेड्डी यांच्या मालकीची आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांनी तब्बल 80 कोटी रुपये मोजले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कायदेशीर अडथळ्यांमुळे मालमत्तेची विक्री पडली होती लांबणीवर

पूर्वी दिवंगत उद्योजक जिमी गझदार यांच्या मालकीच्या असलेल्या तसंच 5 एकरमध्ये पसरलेल्या या बंगल्याच्या मालमत्तेचा करार जूनमध्ये बंद होणार होता, परंतु शेवटच्या क्षणी काही कायदेशीर अडथळ्यांमुळे तो लांबणीवर पडला. अखेर शुक्रवारी त्याची नोंदणी पूर्ण झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. अलीकडच्या काळात गोव्यात झालेल्या सर्वात महागडी मालमत्तेच्या व्यवहारांपैकी हा एक आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने विक्रीला परवानगी देण्यासाठी आधीच्या आदेशात केला बदल

कोलकाता स्थित नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) क्रेडविन होल्डिंग्जने (इंडिया) गझदारवरील जुन्या दाव्याचे कारण देत या कराराला स्थगिती मागितली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने विक्रीला परवानगी देण्यासाठी त्याच्या आधीच्या आदेशात बदल केल्यानंतर आता हा व्यवहार पूर्ण झाला आहे. परंतु क्रेडविन खटला जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत उत्पन्नाचा काही भाग स्वतंत्र खात्यात ठेवण्यास सांगितलं आहे.

6.26 कोटी रुपयांची रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवा

कोलकाता स्थित कायदेशीर कंपनी आर गिनोडिया अँड को. भागीदार श्वेतंक गिनोडिया म्हणाले, माझ्या अशिलाचा क्रेडविन होल्डिंग्ज मालमत्तेचे दिवंगत मालक गझदर यांच्या विरुद्ध दावा होता आणि कोर्टाने सुरुवातीला आम्हाला आदेश दिला होता. खटल्याचा निकाल प्रलंबित असल्याने न्यायालयाने आता विक्रेत्याला स्वतंत्र खात्यात 6.26 कोटी रुपयांची रक्कम बाजूला ठेवण्यास सांगून आमच्या दाव्याचं संरक्षण केलं आहे, असं गिनोडिया म्हणाले.

माध्यमांकडे जाईपर्यंत पिंकी रेड्डी यांच्या टीमला पाठवलेला एक ईमेल प्रश्न अनुत्तरित राहिला, तर व्यवहार सल्लागार इंडिया सोथेबी इंटरनॅशनल रियल्टीने यावर भाष्य करण्यास नकार दिला.

‘पॅलासिओ आग्वाद’बद्दल…

‘पॅलासिओ आग्वाद’ – त्याचा मोठा जलतरण तलाव, एक गुहा, डान्स फ्लोअर आणि चहाची बाग या सगळ्यामुळे 1980 च्या दशकापासून अनेक प्रमुख राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचे यजमानपद भूषविणाऱ्यांसाठी हा एक हॉट व्हेन्यू होता. 13,000 चौरस फुटांपेक्षा जास्त कार्पेट एरिया असलेला हा बंगला उत्तर गोव्याच्या शिकेरी मधील टेकडीवर आहे. इथू मांडवी नदीचं सौंदर्य अनुभवता येतं.

एका आंतरराष्ट्रीय स्थळ या बंदल्याचं रुपांतर करण्याचा रेड्डी यांचा विचार आहे. मालमत्तेचे मूळ आर्किटेक्ट गेरार्ड डिकुन्हा यांना नूतनीकरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती आहे.

या मालमत्तेचा वारसा लाभलेली गझदार यांची भाची रीटा मेहता ही रेड्डी यांच्या आईची जवळची मैत्रीण असल्याचं सांगितलं जातं. रेड्डी यांनी 2020 मध्ये पहिल्यांदा न्यू इयर पार्टीसाठी या व्हिलाला भेट दिली होती आणि या एका प्रकारच्या सुपर लक्झरी स्पेसच्या डिझाइन आणि सौंदर्यशास्त्राने त्या प्रभावित झाल्या होत्या, असं सूत्रांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!