पर्ल अकॅडमी लाँच करत आहे ‘पर्लएक्सस्टुडिओ’

फॅशन, मीडिया व परफॉर्मिंग आर्टसमधील फास्ट ट्रॅक,कोर्सेस घेणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: डिझाइन, फॅशन आणि मीडिया या क्षेत्रांतील भारतातील आघाडीची संस्था पर्ल अकॅडमीने आपल्या पलएक्सस्टुडिओच्या शुभारंभाची घोषणा केली. हा स्टुडिओ सर्व वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी वेगवान सर्जनशील अभ्यासक्रम घेणार आहे. पर्लएक्सस्टुडिओ मीडिया, फॅशन व परफॉर्मिंग आर्टस् या क्षेत्रांतील ४० अभ्यासक्रम घेणार आहे. यांमध्ये ‘फॅशन डिझाइन- विमेन्सवेअर’, ‘स्टायलिंग फॉर इंटिरियर’, ‘पर्सनल स्टायलिंग अँड इमेज कन्सल्टन्सी’, ‘फॅशन अँड सेलेब्रिटी मेक-अप’, ‘परफॉर्मिंग आर्टस्’, ‘डिजिटल फिल्म मेकिंग’, ‘प्रोफेशनल फोटोग्राफी’, ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’, ‘अॅडव्हर्टायजिंग अँड ग्राफिक्स’, ‘प्रोफेशनल इव्हेण्ट्स अँड एक्स्पिरियन्स मॅनेजमेंट’ आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ऑनलाइन/ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमांचा कालावधी ३ महिने एवढा आहे. ३ महिने हा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करता येते किंवा कॅपस्टोन प्रोजेक्टसह (उद्योगक्षेत्रातील इंटर्नशिप) १२ महिन्यांच्या कालावधीत चार अभ्यासक्रम पूर्ण करून पदविका प्राप्त करता येते. 

हेही वाचाः भगवद्गीतेचा संदेश बालपणातच प्रत्येकापर्यंत पोचवण्याचं काम महत्त्वाचं

विद्यार्थ्यांना केवळ तीन महिन्यात मुलभूत बाबींपासून ते प्रगत बाबींपर्यंत नेण्याच्या दृष्टीने फास्ट-ट्रॅक कोर्स डिझाइन करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पर्लएक्सस्टुडिओने प्रोफेशनल विश्वाच्या आवश्यकता लक्षात घेऊन उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी सहयोग केले आहेत.

पर्लएक्सस्टुडिओचा शुभारंभ “मेकिंग ल्युक्रेटिव क्रिएटिव करिअर्स अ‍ॅक्सेसीबल टू ऑल” या विषयावरील एका पॅनल चर्चेने झाली. यामध्ये दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माते-दिग्दर्शक केतन देसाई व फॅशन डिझायनर अंजू मोदी यासारखे दिग्गज सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत ग्लोबल युनिव्हर्सिटी सिस्टम्सच्या आशिया पॅसिफिक विभागाचे सीएफओ शरद मेहरा, पर्ल अकॅडमीच्या अध्यक्ष अदिती श्रीवास्तव, स्कूल ऑफ कंटेम्पररी मीडियाचे डीन विवेक वासवानी, स्कूल ऑफ फॅशनचे डीन अँटोनिओ मॉरिझिओ ग्रिओली हेही चर्चेत सहभागी झाले होते. सर्जनशील क्षेत्रांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची गरज, कौशल्याधारित कामाच्या संधींचे भवितव्य तसेच प्रतिभा व अर्हता यांमध्ये काय अधिक महत्त्वाचे आहे आदी विषयांवर या तज्ज्ञांनी चर्चा केली.

हेही वाचाः आयाबहिणींच्या रक्षणार्थ गोंयकारांनो आता तरी जागे व्हा

प्रवेश प्रक्रियेत लवचिकता राखण्याच्या उद्देशाने प्रवेश वर्षभर दिले जाणार आहेत. पर्लएक्सस्टुडिओ अधिकृतरित्या आपली पहिली बॅच ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू करणार आहे. आंतरराष्ट्रीय फॅकल्टी, प्रोफेशनल तज्ज्ञ आणि उद्योगक्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनासोबतच, ‘कॅपस्टोन’ हे पर्लएक्सस्टुडिओ अभ्यासक्रमांचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. ‘कॅपस्टोन’च्या माध्यमातून नोंदणीकृत विद्यार्थ्यांना २ आठवड्यांचा उद्योग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उद्योगक्षेत्रातील दिग्गज व्यक्तीचे मेंटॉरिंग दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना पर्लएक्सस्टुडिओच्या पदविकेसह मेंटॉरतर्फे एक विशेष ‘कॅपस्टोन प्रमाणपत्र’ प्रदान केले जाणार आहे.

हेही वाचाः ‘नोकिया सी20 प्लस’ भारतात सादर

व्यक्तींना त्यांचे ज्या गोष्टीवर प्रेम आहे ती करण्याची क्षमता देणे व त्यांच्यातील सर्जनशीलता खुली करण्यात तसेच क्षमतांना योग्य दिशेला वळवण्यात मदत करणे हे पर्लएक्सस्टुडिओचे उद्दिष्ट आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!