अॅक्सिस बँक आणि पेनियरबाय यांची भागीदारी…

छोटे मोठे लघु उद्योजक आणि जवळपासच्या दुकानांमधील ग्राहक यांच्याकरता बचत आणि चालू बँक खाती सुरू करणार

रजत सावंत | प्रतिनिधी

मुंबई : अगदी तळागळातील छोटे मोठे किरकोळ विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठी बचत आणि चालू बँक खाती विना अडथळा उघडण्याची योजना सादर करण्यासाठी भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने भारतातील सर्वात मोठे ब्रान्चलेस बँकिंग आणि डिजिटल सेवा नेटवर्क असलेल्या पेनियरबाय बरोबर भागीदारी केली आहे. आधार लीड ऑथेंटिकेशन (e-KYC) द्वारे सक्षम केलेली ही बँक खाती जवळच्या स्थानिक दुकानांमध्ये उघडल्याने ग्राहकांना सुलभ प्रवेश, अधिक सुविधा आणि त्रास-मुक्त प्रक्रिया सुनिश्चित होईल. ही भागीदारी अॅक्सिस बँक आणि पेनियरबायला देशाच्या दुर्गम भागातील संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यासमोरील सर्वसाधारण समस्या जसे की दस्तऐवजीकरणाचा त्रास, दीर्घ प्रक्रिया, तंत्रज्ञान, जवळपास सुविधा नसणे आणि औपचारिक वातावरणाची भीती यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्षम करेल.

संपूर्ण देशभरात विश्वासार्ह आणि सुलभ आर्थिक उपाय उपलब्ध करून देण्याची खात्री करून देत हा उपक्रम अॅक्सिस बँकेला पेनियरबायच्या तंत्रज्ञान प्रणीत डिस्ट्रिब्युशन-अॅज-ए-सर्व्हिस (DaaS) नेटवर्कचा 20,000 हून अधिक पिन कोडवरील ५० लाखहून अधिक सूक्ष्म-उद्योजकांच्या नेटवर्कचा लाभ घेण्यास सक्षम करेल. अॅक्सिस बँकेच्या उत्पादनातील नावीन्यपूर्णता, कामकाजाच्या सर्वोत्तम पद्धती आणि ब्रँड विश्वासार्हता यांच्या पाठबळावर असलेल्या या भागीदारीचे उद्दिष्ट राष्ट्राच्या बँकिंगला पुन्हा चालना देणे आणि भारतातील प्रत्येक लहान व्यवसाय आणि कुटुंबासाठी सक्रिय बँक खाते प्रदान करण्याच्या प्रयत्नांना गती देणे आहे. यामुळे रिटेल दुकान मालक आणि वैयक्तिक ग्राहकांसाठी बँकिंग सुलभ होईल आणि आपले बँक खाते चालवण्यासाठी त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची गरज दूर होईल.

या नवीन कामगिरीविषयी बोलताना अॅक्सिस बँकेचे भारत बँकिंगचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि हेड मुनीष शारदा म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना विशेषत: त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले मूल्य प्रस्ताव देण्यासाठी नावीन्यपूर्ण भागीदारी प्रणीत मॉडेल्सवर सातत्याने काम करत आहोत. पेनियरबाय सह असलेली आमची भागीदारी आम्हांला आमच्या बँकिंग सेवा अर्ध-ग्रामीण आणि ग्रामीण भागातील मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सक्षम करेल आणि आम्ही त्यांना बँक खाते उघडण्यासह अनेक सुविधा देऊ शकू. भारतातील अर्थपूर्ण वाढ आर्थिक समावेशाद्वारे चालविली जाईल आणि ही भागीदारी भारत बँकिंगच्या दिशेने आमचे ध्येय मजबूत करण्यासाठी आणखी एक पाऊल आहे.”

या सहयोगाबद्दल बोलताना पेनियरबाय चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज म्हणाले, “भारताला शेवटच्या टप्प्यावरही आर्थिक आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी स्थानिक किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक साधने दिली जाणे महत्त्वाचे आहे. पेनियरबाय एक संस्था म्हणून आपल्या किरकोळ भागीदारांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन सुधारण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी उत्सुक आहे. भारतातील आघाडीची बँक असलेल्या अॅक्सिस बँकेच्या सुलभ चालू खात्याच्या पर्यायासह आम्ही आमच्या भागीदारांना त्यांच्या पैशांवर अधिक चांगले नियंत्रण देत आहोत. ही प्रक्रिया इतकी सोपी आणि त्रासमुक्त करण्यासाठी आणि आमच्या नेटवर्कमध्ये बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी सक्षम खाते उघडणे सुरू करण्यासाठी आम्ही अॅक्सिस बँकेचे आभार मानतो. यामुळे आमच्या किरकोळ विक्रेत्यांना सशक्त आर्थिक व्यवहार राखण्यासाठी आणि भरभराट करण्यासाठी मदत होईल.

बचत खात्याच्या योजनेसह आम्हाला आशा आहे की आम्ही अॅक्सिस बँकेशी भागीदारी करू आणि बँकिंग व्यवस्था बळकट करू. जेणेकरून देशातील प्रत्येक कुटुंब सक्रिय बँक खाते ऑपरेट करू शकेल. अॅक्सिस बँकेच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि कामकाजाच्या सर्वोत्तम पद्धती ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि वापरण्यास सोपी असल्याचे सुनिश्चित करेल आणि स्थानिक नेटवर्क वरील विश्वास देशभरातील अंगीकार वाढण्यास गती देईल. आम्‍हाला आशा आहे की भारत एका विशिष्ट गतीने औपचारिक आर्थिक पट्‍यापर्यंत पोहोचेल आणि सर्वसामान्य लोकांमध्‍ये बचतीची सवय वर्तणूक वाढेल.”

“या भागीदारीमुळे देशाच्या दुर्गम भागात अॅक्सिस बँकेची पोहोच सुधारून आम्ही आमच्या किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना सक्षम करत आहोत. आमचे किरकोळ भागीदार आणि ग्राहक जीवनात प्रगती करत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण सेवा आणत राहू. पेनियरबाय, जीद आगे बढने की!” असेही ते पुढे म्हणले.

पेनियरबाय सोबत भागीदारी करणारे स्थानिक लघु-सूक्ष्म उद्योजक आता सहजतेने अॅक्सिस बँकेची सेवा मिळवू शकतील आणि त्यांचे व्यावसायिक व्यवहार देखील कार्यक्षम मार्गाने अपग्रेड करू शकतील. ही सेवा जवळच्या रिटेल स्टोअरमध्ये आणल्याने अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत अॅक्सिस बँकेचे चालू खात्यांचे प्रमाण वाढेल. भारतासारख्या वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेशात जिथे अधिग्रहण आणि सेवांचा खर्च अनेकदा दुर्गम भागात अव्यवहार्य ठरतो तिथे या मॉडेलला पेनियरबायच्या विद्यमान पायाभूत सुविधा, स्थानिक विश्वास आणि सर्वांसाठी बँकिंग उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्या उच्च तंत्रज्ञानाचा फायदा होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!