कॅसिनोंना पणजी महापालिकेचा रेड सिग्नल

कॅसिनो कार्यालयांकडे व्यापारी परवाने नाहीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील कॅसिनो 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारनं ग्रीन सिग्नल दिला असला, तरी पणजी महापालिकेनं कॅसिनोंना रेड सिग्नल दाखवलाय. कॅसिनोंच्या व्यापारी परवान्यांचा विषय महापालिकेच्या अखत्यारित येतो. त्यावरून महापौर उदय मडकईकर (Uday Madkaikar) यांनी सस्पेन्स वाढवलाय.

कोरोनामुळे गेले आठ महिने कॅसिनो बंद आहेत. ते सुरू झाल्यानंतर वार्षिक शुल्कापोटी राज्य सरकारला साडेतीनशे कोटी रुपये मिळतील. त्यासाठी सरकारनं कॅसिनो 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास अनुमती दिली. मात्र पणजीतल्या कॅसिनोंची ऑफिसं महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतात. ही कार्यालयं सुरू करण्यासाठी आवश्यक असणार्‍या व्यापारी परवान्यांचं नूतनीकरण अद्याप झालेलं नाही. परवान्यांच्या नूतनीकरणाशिवाय कॅसिनो सुरू होउ शकत नाहीत, असं महापौर उदय मडकईकरांनी स्पष्ट केलंय.

व्यवस्थापनांची धावपळ

महापौरांच्या इशार्‍यानंतर कॅसिनो व्यवस्थापनांनी व्यापारी परवान्यांसाठी धावपळ सुरू केली आहे. हे परवाने मिळवण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्यानं कॅसिनो चालकांनी पणजी महापालिकेचा इशारा गांभीर्यानं घेतलाय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!