ऑनलाईन, केवायसी फसवणुकीला बळी पडू नका

‘वी’चा ग्राहकांना सार्वजनिक सल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आमच्या असं निदर्शनास आलं आहे की, ‘वी’च्या काही ग्राहकांना अनोळखी क्रमांकावरून एसएमएस आणि कॉल्स येत आहेत ज्यामध्ये त्यांना त्यांचे केवायसी तातडीने अपडेट करण्यास सांगितलं जात आहे. फसवणुकीच्या उद्देशाने एसएमएस आणि कॉल्स करणारे हे लोक स्वतः कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवतात आणि केवायसी अपडेट न केल्यास सिम ब्लॉक होईल अशी भीती देखील युजर्सना दाखवतात.  ते लोक तपासणीची बतावणी करून ग्राहकांकडून काही गोपनीय माहिती देखील काढून घेतात.

हेही वाचाः फ्लॅटमधून ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

‘वी’ आपल्या सर्व ग्राहकांना अशा अनधिकृत कॉल्स व एसएमएस विरोधात जागरूक राहण्याची विनंती करत आहे. ‘वी’ग्राहकांना आम्ही असा सल्ला देत आहोत की त्यांनी आपले केवायसी तपशील किंवा कोणताही ओटीपी कोणालाही कॉलवर देऊ नये, अशा कॉल क्रमांकावर पुन्हा कॉल करू नये तसेच एसएमएसमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नये.

हेही वाचाः फंडपेटी फोडल्याप्रकरणी एकाला अटक

आम्ही ग्राहकांना सूचित करू इच्छितो की, जिचा खरेखोटेपणा तपासण्यात आलेला नाही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केल्याने किंवा आपली कोणतीही माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीला दिल्याने तुमच्या मोबाईल डिव्हाईसमधील माहिती चोरली जाऊ शकते आणि याचे इतरही अनेक गंभीर नुकसानकारक परिणाम होऊ शकतात.

हेही वाचाः विहिरीत पडलेल्या तरुणाला जीवदान

कंपनीकडून ग्राहकांना पाठवले जाणारे सर्व संदेश हे फक्त या एसएमएस आयडीवरूनच पाठवले जातात.  या एसएमएस आयडीवरून न आलेल्या कोणत्याही एसएमएसवर अजिबात विश्वास ठेऊ नये आणि त्या एसएमएसमध्ये करायला सांगितलेल्या गोष्टी अजिबात करू नयेत, त्यातील लिंकवर क्लिक करू नये. आमच्या ग्राहकांना आणि व्यवसायांना डिजिटल जगामध्ये यशस्वी होता यावे यासाठी त्यांचे सर्वात विश्वसनीय आणि मौल्यवान साथीदार बनण्यासाठी ‘वी’ वचनबद्ध आहे.  

हा व्हिडिओ पहाः Video | BEEF CONTROVERSARY | मेघालयच्या मंत्र्याच्या वक्तव्याच्या गोप्रेमेंकडून निषेध

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!