कांदा भजीत कोबीचं वर्चस्व! कांदाभजीत होतोय घोटाळा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : कांदे महागलेत. शंभर रुपये किलोवर कांदे पोहोचलेत. सर्वसामान्यांना कांदा जसा परवडेनासा झालाय, तसाच तो हॉटेलवाल्यांनाही परवडेनासा झालाय. भजीमध्ये कांद्याची जागा आता कोबीने घेतल्याचं दिसतंय. कांदाभजी खाण्यासाठी म्हणून तुम्हाला जर त्यात कोबी सापडला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
कांद्याने रडवलं
चहाबरोबर गरमागरम कांदाभजी कुणाला नाही आवडणार? पण कांदे महागल्यानं भजीची चवच गेली आहे. त्यामुळे खवय्ये नाराज आहत. कांद्याची किंमती शंभरी पार जाण्याची शक्यताय. भाव परवडत नसल्यानं हॉटेलवाल्यांनीही अनोखी शक्कल लढवली आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेला असताना आता महागलेले कांदेही हॉटेलमालकांना रडवत आहेत.
80 टक्के कोबी
बाहेरच्या खाण्यामधून कांद्याचं प्रमाण प्रचंड कमी झालंय. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कांदा, लोणचं, लिंबू अशी प्लेट समोर आता येईलच, अशी आशा बाळगू नका. कारण अनेक हॉटेल्समध्ये कांद्याऐवजी आता कोबी समोर आणला जातोय. अनेक हॉटेल्समध्ये भाजीच्या मिश्रणात तब्बल 80 टक्के कोबी वापरला जातोय. तर कांद्याचं प्रमाण आहे अवघं वीस टक्के.
मंहगाई डायन
कांदा वापरण्याचं प्रमाण कमी झाल्यानं भाजीच्या चवीतही फरक पडलाय. कुरकुरीतपणाही गायब झालाय. महत्त्वाचं म्हणजे येत्या काळात कोबीचं हेच प्रमाण ऐंशी टक्क्यवरुन शंभर टक्क्यांवर ही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भविष्यात कांदा आणखी महागेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान काँग्रेसने महागलेल्या कांद्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी २५ रुपये दराने कांदा विक्री करण्यात आली. गळ्यात कांद्याची माळ घालून कशाप्रकारे हे आंदोलन करण्यात आलं…
पाहा व्हिडीओ
हेही वाचा –
‘पवार’फुल्ल भेट! कामत शरद पवारांना भेटले, भेटीत ‘चाय पे चर्चा’
‘काणकोण धरणावरील अश्लिल व्हिडीयोतून सिद्ध झालं भाजपा पोर्न माफियाला प्रोत्साहन देतंय’