स्वस्त सरकारी कांदा मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत बजेट पार कोलमडणार कारण….

कांदा सेन्च्युरी मारणार बहुतेक!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्य सरकारनं कांदा स्वस्त दरात देण्याची घोषणा केली. त्यानंतर कांद्याच्या खरेदीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. पण आता इतरही भाज्या महाग झाल्यानं लोकांचं जगणं मुश्किल झालंय.

किती खरेदी?

राज्य सरकारनं थेट नाशिकहून तब्बल 1 हजार मॅट्रिक टनपेक्षा जास्त कांद्याची खरेदी केली आहे. यासाठीची खरेदी प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. लवकरच हा कांदा रेशन दुकानांवर उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

राज्य सरकारने नाशकातल्या राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला 1 हजार 45 मॅट्रीक टन कांद्याची ऑर्डर दिलीय. हा खरेदी केलेला कांदा लवकरच गोव्यात येणार आहे. त्यानंतर हा कांदा लवकरच रेशन दुकानांवर पोहोचवला जाणार आहे. राज्यात कांदा उपलब्ध झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे त्याची माहिती रेशनकार्ड धारकांना देण्यात येणार आहे.

कंबरडं मोडलं

दरम्यान तूर्तासतरी राज्यातील लोकांचं महागलेल्या भाज्यांनी कंबरडं मोडलंय. कांद्यापाठोपाठ बाजारात सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांचे दर गगनाला भिडलेत. खुली मार्केट आणि फलोप्तादन महामंडळाच्या स्टॉल्सवरही भाज्यांचे दर दुप्पट झालेत. अवकाळी पावसामुळे भाज्यांना फटका बसलाय. त्याचा परिणाम दरांवर झाल्याचं पाहायला मिळतंय.

खरंतर तर सरकार रेशनकार्ड धारकांना 32 ते 33 रुपये दराने प्रत्येकी तीन किलो कांदे देणार आहे. हे तीन किलो कांदे किती दिवस पुरणार हा प्रश्न आहेच. कारण येत्या काही आठवड्यात कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. सोबतच इतर भाज्यांचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य बेहाल झालेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

एकच नंबर | पीएसीही म्हणतंय सुशेगाद गोवा नव्हे सुशासित गोवा!

म्हापसा अर्बन बँकेसंदर्भातली महत्त्वाची बातमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!