कामाची बातमी! 5, 10 आणि 100च्या नोटांबाबत लवकरच मोठा निर्णय

आरबीआयच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटाबंदीनंतर नोटांसंबंधी कोणतीही बातमी सर्वसामान्यांना धडकी भरवून जाते. अशाताच आता पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटांबाबत एक महत्त्वाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

काय आहे निर्णय?

पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या सिरीजच्या नोटा मार्च- एप्रिल अखेर चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दिली आहे.

जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका… असे कवी केशवसुतांनी ‘तुतारी’ कवितेत म्हटले आहे. आता चलनाच्याबाबतीतही असेच काहीसे होण्याची शक्यता आहे. जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय फक्त नोटांबाबत होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे नाणी वापरणाऱ्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आहे. तेव्हा जुन्या सीरिजच्या नोटा बँकेत जमा करून नव्या नोटा घ्याव्या लागतील.

तब्बल 15 वर्षांपूर्वी 10 रुपयांचे नाणे चलनात आणले होते. त्यानंतर व्यापारी आणि उद्योगपतींनी हे नाणे स्वीकारले नाही.त्यामुळे हे नाणे बँकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. बँका या नाण्यांनी भरून गेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

नेमकं काय म्हटलंय?

आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. महेश यांनी फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार,

मार्च किंवा एप्रिलपर्यंत १००, १० आणि ५ रुपयांच्या ‘जुन्या सीरिज’च्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार बॅंक करत आहे. यापुढे बँकेत जमा होणाऱ्या जुन्या नोटा परत चलनात येणार नाही, याची तयारी केली आहे. दहा रुपयांचे नाणे बाद झालेले नाही. लोकांनी ते जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज आहे. १०० च्या नव्या जांभळ्या रंगाच्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत.

हेही वाचा –

बापरे! पतंजलीच्या मधात साखरेच्या पाकाची भेसळ

कोरोना कोमात, रामदेव बाबांच्या पतंजलीचं कोरोनिल जोमात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!