‘नायका’ने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

३५०० ते ४००० कोटींच्या आयपीओमुळे नायकाचे मूल्य ५.० बिलियन डॉलर्स ते ५.५ बिलियन डॉलर्सवर पोहोचणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ग्राहकांना कन्टेन्टच्या नेतृत्वाखालील, जीवनशैलीशी संबंधित उत्पादनांच्या रिटेलचा अनुभव प्रदान करणारा, डिजिटली स्वदेशी ग्राहक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने आपले ड्राफ्ट रेड हेररिंग प्रॉस्पेक्टस बाजार नियंत्रक सेबीकडे दाखल केले आहे.  सौंदर्य प्रसाधने, व्यक्तिगत स्वच्छता व काळजी, फॅशन उत्पादनांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो कंपनीकडे असून त्यामध्ये नायका आणि नायका फॅशन या दोन नावांतर्गत त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या व कंपनी स्वतः उत्पादन करत असलेल्या ब्रँड उत्पादनांचा देखील समावेश आहे.

हेही वाचाः ऑनलाईन, केवायसी फसवणुकीला बळी पडू नका

या आयपीओमध्ये ५२५० मिलियन रुपयांच्या इक्विटी समभागांच्या फ्रेश इश्यूचा आणि समभागांची विक्री करू इच्छित असलेल्या समभागधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत केल्या जात असलेल्या ४३,१११,६७० पर्यंत समभागांचा समावेश असणार आहे.  या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांकडून खरेदी केले जाण्यासाठी काही इक्विटी समभाग राखून ठेवले जाणार आहेत.  समभागांची विक्री करू इच्छित असलेल्यांमध्ये काही खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांचा समावेश आहे, जसे, टीपीजी ग्रोथ अँड लाईटहाऊस फंड्स आणि इतर व्यक्तिगत समभागधारक.  परंतु बहुतांश गुंतवणूकदार आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेत नाही आहेत, आयपीओनंतर ते कंपनीमध्ये आपली काही हिस्सेदारी कायम राखणार आहेत.  प्रमोटर अँड प्रमोटर ग्रुप कंपन्यांपैकी एक कंपनी देखील विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये आपले काही समभाग विकत आहे पण त्याचे प्रमाण प्रमोटर अँड प्रमोटर ग्रुपकडील शेयरहोल्डिंग्सच्या २% पेक्षा देखील कमी आहे.  प्रमोटर अँड प्रमोटर ग्रुपकडे कंपनीच्या समभागांपैकी ५१% पेक्षा जास्त समभाग कायम राहतील.

हेही वाचाः फ्लॅटमधून ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये विकण्यात आलेल्या उत्पादनांच्या मूल्याच्या संदर्भात विचार करता ही कंपनी म्हणजे भारतातील सर्वात मोठा स्पेशालिटी ब्युटी व पर्सनल केयर प्लॅटफॉर्म आहे.  त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष २०२० ते आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत जीएमव्हीमधील वाढीच्या संदर्भात ही कंपनी भारतातील सर्वाधिक वेगवान वाढत असलेल्या फॅशन प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे.  कंपनीने आर्थिक वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत  जीएमव्हीमध्ये जवळपास ५७% सीएजीआर आणि आर्थिक वर्ष २०१९ पासून २०२१ पर्यंत महसूलच्या बाबतीत ४८% पेक्षा जास्त सीएजीआर नोंदवला आहे.

हेही वाचाः फंडपेटी फोडल्याप्रकरणी एकाला अटक

नायका इतरांपेक्षा वेगळे आहे याचे कारण म्हणजे नव्या युगातील ग्राहक इंटरनेट कंपन्यांमध्ये फक्त लाभदायक असलेल्या कंपन्यांपैकी म्हणजे नायका आहे.  आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्यांनी ६१९.४५ मिलियन रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.  गेल्या तीन वर्षांहूनही अधिक काळापासून ही कंपनी सातत्याने ईबीआयटीडीए पॉझिटिव्ह आहे.

हेही वाचाः विहिरीत पडलेल्या तरुणाला जीवदान

या आयपीओमुळे कंपनीचे मूल्य जवळपास ५.० बिलियन डॉलर्स ते ५.५ बिलियन डॉलर्स इतके होण्याची शक्यता आहे. आयपीओमधून उभी राहणारी गुंतवणूक व्यवसाय विस्तारासाठी वापरण्याची कंपनीची योजना आहे, त्यासाठी नवीन रिटेल स्टोर्स व नवीन वेअरहाऊसेस स्थापन केली जातील.  तसेच आपली काही कर्जे कमी करण्याचेही कंपनीने ठरवले आहे, ज्यामुळे अंतर्गत खर्च कमी होतील व लाभदायिकता अधिक जास्त वाढेल.  आयपीओमधून मिळणाऱ्या गुंतवणुकीचा उपयोग मार्केटिंग व प्रमोशनल कामांसाठी देखील केला जाणार आहे, तसेच “नायका कॉस्मेटिक्स”, “नायका नॅचरल्स” व “के ब्युटी” यासारख्या स्वतःच्या मालकीच्या १३ ब्रँड्सना अधिक जास्त बळकट करण्यावर कंपनी भर देणार आहे.  त्याचबरोबरीने नवीन ब्रँड्स सुरु करून त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्याची देखील कंपनीची योजना आहे.

हेही वाचाः जगाला थक्क करणारी ‘मेडल मशिन्स’

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हे ग्लोबल कोऑर्डिनेटर्स व बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.  बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड व जेएम फायनान्शियल लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

हेही वाचाः ‘ईडी’ची फ्लिपकार्टला नोटीस ; 10,600 कोटींचा ठोठावला दंड

रेडसीरच्या नायकाबद्दलच्या अहवालातील काही ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत:

१.  आर्थिक वर्ष २०२१ मध्ये फॅशन उत्पादनांच्या २.४ मिलियन ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या होत्या आणि त्याचा एकूण जीएमव्ही ६६५५.७ मिलियन रुपये होता. आर्थिक वर्ष २०२० पासून आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत जीएमव्हीमधील वाढीच्या अनुषंगाने नायका फॅशन हा भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या फॅशन प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. 

२.  ३१ मार्च २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार भारतात ऑनलाईन ब्युटी आणि पर्सनल केयर क्षेत्रात या कंपनीचे इन्फ्ल्यूएंसर नेटवर्क सर्वात मोठे आहे, त्यांचे १३६३ इन्फ्ल्यूएंसर्स असून त्यामध्ये जेन झेड ट्रेंड सेटर्स, मॉमी ब्लॉगर्स, ब्युटी, फॅशन अँड लाईफस्टाईल ब्लॉगर्स, मेकअप आर्टिस्ट्स आणि सेलिब्रेटीजचा समावेश आहे.

३.  ३१ मार्च २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मिळून १२.६ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेली ही कंपनी भारतातील सर्वाधिक इन्फ्ल्यूएन्शियल लाईफस्टाईल प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे.

४.  ३१ मार्च २०२१ पर्यंत ३.१ मिलियन सदस्यांच्या स्केलपर्यंत पोहोचणारे नायका नेटवर्क हे भारतातील पहिले इंटरॅक्टिव्ह ब्युटी फोरम आहे.  याठिकाणी सदस्य सौंदर्य क्षेत्रात रुची असलेल्या इतर व्यक्तींसोबत बातचीत करू शकतात, सौंदर्यविषयक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात किंवा प्रश्न विचारू शकतात, सल्ला देऊ शकतात व मागू शकतात, ट्रेंड्स जाणून घेऊ शकतात, आपल्या आवडीच्या विषयावरील सौंदर्यविषयक चर्चेत, संभाषणांमध्ये सहभागी होऊ शकतात.          

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!