‘या’ म्युच्युअल फंड कंपनीकडून समभाग विक्रीची घोषणा

प्रति समभाग 552 ते 524 रुपये निश्चित. 2 हजार 160 कोटी रुपये उभे करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : म्युच्युअल फंड यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनीने गुरुवारी प्राथमिक सार्वजनिक भागविक्रीची घोषणा करताना, प्रति समभाग 552 ते 554 रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे.

येत्या मंगळवार 29 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबपर्यंत चालणाऱ्या भागविक्रीतून, किंमत पट्टय़ाच्या वरील किंमतीनुसार 2 हजार 160 कोटी रुपये उभे केले जातील. निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी आणि एचडीएफसी एएमसीनंतर भांडवली बाजारात सूचीबद्ध होणारी यूटीआय एएमसी ही तिसरी म्युच्युअल फंड कंपनी आहे. प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले ३.89 कोटी समभाग विक्रीला खुले होणार आहेत.

स्टेट बँक, एलआयसी, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि टी. रोव हे यूटीआयचे प्रवर्तक या भागविक्रीमार्फत आपला हिस्सा विकणार आहेत. विक्रीपश्चात टी रोव कंपनीतील सर्वात मोठा भागधारक असेल.

माझगाव डॉक शिपबिल्डर्सनेही जाहीर केली समभागविक्री
सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सनेही 29 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान प्रति समभाग 135 ते 145 रुपयांदरम्यान समभागविक्री विकणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या एका आभासी पत्रकार परिषदेत, या समभाग विक्रीमार्फत, युद्धनौका बनविणाऱ्या कंपनीतील मालकी हिस्सा भारत सरकारकडून शिथिल केला जाईल. एकूण 3.05 लाख समभाग विकून 444 कोटी रुपये उभारणे अपेक्षित आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!