‘लोकमान्य’तर्फे आनंदी जीवन गुंतवणूक योजना

18 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 9% व्याजदराने मिळणार परतावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सुयोग्य कालावधीत आकर्षक व्याज परतावा देणारी गुंतवणूक योजना म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची ‘आनंदी जीवन’ ही योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली आहे. या योजनेस ग्राहक, सभासद, गुंतवणूकादारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतो आहे.

या योजनेत ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना केवळ अठरा महिन्यांच्या गुंतवणुकीवर सुमारे 9% व्याजदराने परतावा मिळणार आहे. ज्यामध्ये किमान गुंतवणूक रक्कम फक्त रु. 10 हजार आहे. तर या योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिकचे व्याज मिळणार आहे. या योजनेतून मिळणारा परतावा पाहता तो आजच्या आर्थिक परिस्थितीत सर्वोत्तम व सर्वाधिक असा आहे.

कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेने अनेक चढउतार अनुभवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपलब्ध गुंतवणूक योजनांच्या तुलनेत ही योजना सर्वोत्तम व सुरक्षित असा परतावा देणारी योजना आहे. कमी कालावधीत चांगला परतावा देणारी ही गुंतवणूक योजना ठरणार आहे.

विशेष म्हणजे ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून (www.lokmanyaonline.com/deposit) सभासद, ग्राहकांना घरबसल्या या योजनांमध्ये पैसे गुंतविता येणार आहेत. कोरोना काळात गुंतवणूकदारांचा विचार करून केलेल्या गुंतवणूकीवर आकर्षक असा हमखास परतावा ग्राहकांना मिळावा या उद्देशाने सोसायटीने ही योजना सादर केली आहे.

लोकमान्य सोसायटीच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधून ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!