व्यवसायांसाठी ‘वी नेक्स्ट’ जनरेशन क्लाऊड फायरवॉल सोल्युशन्सची सुरुवात

वी बिझनेसने आपला सिक्युरिटी पोर्टफोलियो अधिक जास्त मजबूत केला

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: डिजिटल तंत्रज्ञानाचा वेगवान प्रसार, घरून काम आणि अधिकाधिक कामांचे क्लाऊड मायग्रेशन यामुळे व्यवसायांच्या दैनंदिन कामकाजात विश्वसनीय सुरक्षा सुविधांची निकड निर्माण झाली आहे. आपल्या ग्राहकांना त्यांच्या व्यवसायांशी संबंधित धोक्यांपासून संरक्षण मिळवून देणं महत्त्वाचं असल्याचं ‘वी बिझनेस’च्या लक्षात आलं आणि म्हणूनच व्यवसायांना अधिक जास्त सुरक्षा देणारी वी क्लाऊड फायरवॉल ही विशेष सुविधा वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या (वीआयएल) या एंटरप्राइज विभागाने सुरु केली आहे.  यामुळे वी बिझनेसचा सिक्युरिटी पोर्टफोलियो आता अधिक जास्त मजबूत झाला आहे.

हेही वाचाः पाच गुन्हे, १३ गजाआड; २.३१ किलोचा ड्रग्ज जप्त

सहयोगात्मक धोरण कायम राखत वी बिझनेसने सुरक्षा तंत्रज्ञान प्रदान करणारी आघाडीची कंपनी फर्स्टवेव क्लाऊड टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी करत आधुनिक काळातील व्यवसाय गरजांसाठी वी क्लाऊड फायरवॉल ही सुविधा सुरु केली आहे. वीच्या ओपनस्टॅक रेडहॅट क्लाऊड एन्व्हायरन्मेंटसाठी तयार करण्यात आलेल्या आणि फर्स्टवेवच्या क्लाऊड कन्टेन्ट सिक्युरिटी प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवस्थापन केल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण, बहुउपयोगी आणि खास वी क्लाऊड फायरवॉल्सची रचना करण्यात फर्स्टवेव क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत झाली आहे.  फायरवॉल सोल्युशनला पालो अल्टो नेटवर्क्स व्हीएम-सिरीज व्हर्च्युअल नेक्स्ट-जनरेशन फायरवॉल (एनजीएफडब्ल्यू) या आघाडीच्या तंत्रज्ञानाची शक्ती लाभली आहे.

हेही वाचाः पेडणे तालुक्यात एक-चौदाचा उतारा ऑनलाईन मिळवण्यात अडचणी

वी क्लाऊड फायरवॉल अत्याधुनिक फायरवॉल वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. गेटवे अँटी-व्हायरस, डीडीओएस संरक्षण, सुरक्षित व्हीपीएन, डेटा गहाळ होण्यास प्रतिबंध, कन्टेन्ट फिल्टरिंग, रियल-टाईम इंटेलिजन्स यांचा वी क्लाऊड फायरवॉलच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये समावेश आहे.  किमतीचे पुरेपूर मूल्य देणाऱ्या, लवचिक आणि नेटवर्कवर आधारित सुविधेमध्ये कॅपेक्स आणि स्पर्श संपर्क काहीही नाही आणि यामध्ये व्यवसायांना आपल्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधा उभाराव्या व चालवाव्या लागत नाहीत.  सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करू शकणारी ही सुविधा आहे. वेगवान प्रतिसाद, क्षमतावृद्धी करण्याचे पर्याय, पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याची गरज नाही, अंतर्गत आयटी टीम्सवर अवलंबून न राहता संपूर्णतः व्यवस्थापित सेवा असे अनेक लाभ यामध्ये मिळतात.

हेही वाचाः जीसीझेडएमपीसाठीची फेर जनसुनावणी आता 8 जुलै रोजी

ठळक वैशिष्ट्ये

अत्याधुनिक फायरवॉल

गेटवे अँटी-व्हायरस/अँटी-स्पॅम

झिरो डे एपीटी प्रोटेक्शन

धोक्यांना प्रतिबंध घातला जातो

बॉटनेट व आयपी डोमेन संरक्षण

ऍप्लिकेशन व युजर आयडेंटिटी कंट्रोल  

हेही वाचाः एटीएस कमांडो जयदेव सावंत सेवेत दाखल

आज अनेक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत, व्यवसायाच्या गरजांनुसार वाढवता येण्याजोग्या आयटी व सुरक्षा क्षमता उभारल्या जाणे देखील त्यांच्यासाठी आवश्यक बनले आहे.  संभाव्य सुरक्षा धोके टाळण्यासाठी क्लाऊडचा वापर आणि त्याद्वारे मिळणारे संरक्षण या मोठ्या व लहान दोन्ही प्रकारच्या व्यवसायांच्या प्राथमिकता बनल्या आहेत.  वी क्लाऊड फायरवॉल ही लवचिक, सब्स्क्रिप्शनवर आधारित सुविधा आहे जी सर्व क्षेत्रातील व्यवसायांसाठी व्यवसाय संचालन, कनेक्टिविटी आणि सुरक्षा या गोष्टी सहजसोप्या बनवते.  वी क्लाऊड फायरवॉल सुरु करून वी बिझनेसने आपल्या व्यावसायिक ग्राहकांना सर्वसमावेशक व एकीकृत कनेक्टिविटी व सुरक्षा सुविधा प्रदान करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असं सुरक्षा सुविधा सादर करताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर अभिजित किशोर यांनी सांगितलं.

हेही वाचाः कोरोना रुग्णवाढ 1 लाखाच्या आत! 66 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण

वी बिझनेसच्या सुरक्षित इंटरनेट पोर्टफोलियोचा अविभाज्य भाग असलेली  अत्याधुनिक क्लाऊड फायरवॉल ही अभिनव सुविधा सुरु करण्यासाठी वी बिझनेससोबत भागीदारी करताना फर्स्टवेवला खूप आनंद होत आहे.  वी बिझनेस आणि फर्स्टवेव क्लाऊड या दोन्ही टीम्सनी गेले अनेक महिने अथक परिश्रम करून वी बिझनेसच्या ग्राहकांसाठी ही नाविन्यपूर्ण सुविधा तयार केली आहे.  आता भारतातील उद्योग-व्यवसाय वीच्या सासवर आधारित सायबरसुरक्षा सेवांचा लाभ घेऊ शकतात.  क्लाऊड फायरवॉल्सपासून सुरुवात झाली असून भविष्यात ई-मेल व वेब सुरक्षा या सुविधा देखील वीच्या अतुलनीय नेटवर्कमार्फत फर्स्टवेवच्या सीसीएसपी प्लॅटफॉर्मचा उपयोग करत ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातील.  या संपूर्ण वाटचालीत वी बिझनेसला साथ देताना फर्स्टवेव टीम अतिशय उत्साहाने व पूर्णपणे वचनबद्ध राहून काम करत आहे, असं वी बिझनेससोबत भागीदारीबाबत प्रतिक्रिया देताना फर्स्टवेव क्लाऊड टेक्नॉलॉजीचे सीईओ नील पोलॉक यांनी सांगितलं.

हेही वाचाः गोव्यात अनलॉक प्रक्रिया कधीपासून? मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘ही’ तारीख

वी क्लाऊड फायरवॉलचा वापर करून बीएफएसआय, आरोग्यसेवा, उत्पादन, रिटेल, प्रवास, लॉजिस्टिक्स, स्थावर मालमत्ता, एनबीएफसी, शिक्षण इत्यादी क्षेत्रातील व्यवसाय-उद्योगांना प्रमाणित सुरक्षा व्यावसायिकांच्या देखरेखीखाली चालवण्यात येणाऱ्या सर्वोत्तम सुरक्षा प्रथांचे आणि २४X७ निगराणी व अवलोकन यांचे लाभ मिळू शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!