कामा आयुर्वेदतर्फे गोव्यात पहिल्या स्टोअरचा शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः संस्कृती, संपन्न वारसा आणि आयुष्य भरभरून जगण्याची आस जपणाऱ्या गोव्यामध्ये कामा आयुर्वेद या भारतातील आघाडीच्या लक्झ्युरी आयुर्वेदिक ब्युटी अँड वेलनेस ब्रँडने आपल्या ग्राहकांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या ब्रँडने गोव्यात आपले पहिले स्टोअर सुरू केले आहे. पणजीमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक आझाद मैदान आणि मांडवी नदीच्या समोरील बाजूस हे स्टोअर सुरू करण्यात आले आहे.
आयुर्वेदिक सौंदर्याला लक्झ्युरी आणि अभिजात स्वरूप
गोव्यात 357 चौ. फुटांवर वसलेल्या या नव्या स्टोअरच्या भिंती आयव्हरी रंगाने सजल्या आहेत तर चेकबोर्ड मार्बलचं फ्लोरिंग इथे वापरण्यात आलं आहे. साग आणि वेताच्या कॅबिनेट्ससोबतच इथे ब्रास आणि लोखंडाने बनलेल्या कपाटाच्या रांगांची सजावट आहे. या सौंदर्यपूर्ण सजावटीमुळे इथे आयुर्वेदिक सौंदर्याला लक्झ्युरी आणि अभिजात स्वरूप मिळाले आहे.
हेही वाचाःगोमंतकीय शुभमचे पहिल्याच सामन्यात ५ बळी…
कामाची अप्रतिम उत्पादने आता गोव्यात उपलब्ध
या शुभारंभप्रसंगी कामा आयुर्वेदचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक साहनी म्हणाले, गोव्यात पणजी येथे नव्या स्टोअरची घोषणा करताना आम्हाला फारच आनंद होतोय आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली काही अप्रतिम उत्पादने आता या राज्यात उपलब्ध करून देण्याची आम्हाला संधी मिळाल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो.

आयुर्वेद आणि आधुनिकता यांचा मेळ साधणारी उत्पादने
कामा आयुर्वेदने आयुर्वेद आणि आधुनिकता यांचा मेळ साधत अशी उत्पादने आणली आहेत जी दैनंदिन आयुष्यात वापरता येतील. यात स्किनकेअर, हेअरकेअर, बॉडी केअर आणि वेलनेसचा समावेश आहे. या अनोख्या डिझाइन सौंदर्यदृष्टीमुळे हा ब्रँड भारतीय सौंदर्य उद्योगात समकालीन आयुर्वेदाला आघाडीवर ठेवणारा ब्रँड ठरला आहे.
अस्सल आयुर्वेदिक तत्वांवर आधारित कामा आयुर्वेद
गोव्यातील ग्राहकांना आता विविध लोकप्रिय आणि बेस्टसेलिंग ब्रँडची खरेदी करताना या ब्रँडचा आपुलकीचा आणि नीट लक्ष देणाऱ्या सेवेचा अनुभव घेता येईल. कुमकुमादी स्किनकेअर रेंज, ब्रिंगादी इंटेंसिव्ह हेअरकेअर रेंज, प्युअर रोझ वॉटर, नालपमरादी तैलम स्किन ब्राइटनिंग ट्रिटमेंट अशा ब्रँड्ससोबतच अत्यंत सुंदररित्या बनवलेले गिफ्ट सेट्स अशा अनेक वस्तू इथे खरेदी करता येतील. अस्सल आयुर्वेदिक तत्वांवर आधारित कामा आयुर्वेद आपल्या मूळ फॉर्म्युलेशनशी आजही प्रामाणिक आहे. ब्रँडच्या उत्पादनांची परिणामकारकता अधोरेखित करण्यासाठी आणि त्यातील समस्या निराकरणाचा भाग मांडण्यासाठी या दाव्यांना आधुनिक जगतातील क्लिनिकल ट्रायल्सचीही जोड देण्यात आली आहे.