JIO 5G NOW IN GOA : जिओ ट्रू 5Gचे गोव्यातील पणजीत अनावरण , गोव्यामध्ये 5G लाँच करणारा जिओ हा पहिलाच आणि एकमेव ऑपरेटर

भारतातील 184 शहरे आता जिओ 5G च्या आवाक्यात, 17 राज्यांतील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G सेवा सुरू

ऋषभ | प्रतिनिधी

24 जानेवारी २०२३ : LAUNCH OF 5G IN GOA, TELECOMMUNICATION

Reliance Jio 5G Now Available In Haryana, Goa And More Cities: All Details

LAUNCH OF 5G IN PANJIM-GOA :गोव्याची राजधानी पणजी शहर आज जिओ ट्रू 5Gनेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी 17 राज्यातील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G लाँच करून जिओने एकप्रकारे विश्वविक्रम केला.

आजपासून, जिओ वेलकम ऑफर पणजी सह 17 राज्यांमधील 50 शहरांमध्येही सुरू झाली. ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.

Reliance Jio 5G Announced: Which Cities Will Get Jio 5G First, Jio Fiber  Expansion And More

याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पणजी मध्ये जिओ ची 5G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून पणजी शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे.

आम्ही जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह पणजी आणि गोव्यातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. गोआ डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही गोवा सरकारचे आभारी आहोत.”

आजपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.

जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने 4G नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू 5G नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू 5G सह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते जसे की कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग.

Jio to bring standalone 5G service in India: What is it, its benefits and  more | Mint

जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल

सर्व निकष आपूर्तीत झाल्यावर तुम्हाला वरील मेसेज येईल.
तुम्ही Jio 5G वेलकम ऑफरसाठी पात्र झाल्यावर तुम्हाला WhatsApp अलर्ट देखील मिळतील.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!