आयआरएफसीने देशांतर्गत बाजारपेठेतून उभारले १३७५ कोटी रुपये

देशांतर्गत बॉन्ड्स जारी करून त्यामार्फत १३७५ कोटी रुपये उभारले

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः भारतीय रेल्वेजची समर्पित अर्थसहाय्य कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनने देशांतर्गत बॉन्ड्स जारी करून त्यामार्फत १३७५ कोटी रुपये उभारलेत.

सार्वभौम आलेखाला छेद देण्याच्या दुर्मिळ घटना

हा फंड ६.८० टक्के कूपन रेटला २० वर्षांच्या मॅच्युरिटीसह जारी करण्यात आला आहे, सीसीआयएलच्या काल दिवसाखेरीसच्या आकडेवारीनुसार बेंचमार्क सममूल्य उत्पन्न सरकारी सिक्युरिटीपेक्षा जवळपास १८ बेसिस पॉईंट्स कमी आहे. एखाद्या आघाडीच्या रेटेड सरकारी जारीकर्ता कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत इतक्या मोठ्या मार्जिनने सार्वभौम आलेखाला छेद देण्याच्या दुर्मिळ घटनांपैकी ही एक घटना आहे. देशातील मोठ्या ऋण गुंतवणूकदारांनी आयआरएफसीच्या योजनांवर विश्वास दर्शवल्याचे हे द्योतक आहे, आयपीओनंतर व सरकारी भागभांडवल कमी झाल्यानंतर खर्च वाढण्याबाबत आणि जोखीम वाढण्याबाबत जे कयास लावले जात होते त्यावर अशाप्रकारे काट मारली गेलीये.

६ पटींनी ओव्हरसब्सक्राईब

कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात नमूद केले आहे की, “बॉन्डला दीर्घकालीन/प्रामुख्याने प्रोविडेंट फंड्सचा समावेश असलेल्या अल्ट्रा-लॉंग-टर्म गुंतवणूकदारांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ५०० कोटी रुपयांच्या मूळ इश्यू आकाराशी तुलना करता हा इश्यू ६ पटींनी ओव्हरसब्सक्राईब झाला आहे.”

वर्तमानात कर्ज घेण्यासाठी कंपनीकडून निर्णय

त्यात पुढे असे देखील म्हटले आहे की, वर्तमान आर्थिक वर्षासाठी रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या कर्ज घेण्याच्या उद्दिष्टानुसार कंपनीने १३७५ कोटी रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पन्न आलेखाचा एक नवा मापदंड

आताचा हा बॉंड मिळून चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत भांडवली बाजारपेठेत २० वर्षांचे बॉंड जारी करून उभारण्यात आलेली एकूण रक्कम १३,९७० कोटी पर्यंत पोहोचली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील कॉर्पोरेट बॉंड्स १० वर्षांपर्यंत लिक्विड आहेत. आयआरएफसीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉंड्स जारी केल्याने दीर्घकालीन आणि अति दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी कॉर्पोरेट बॉंड्स बाजारपेठ अधिक विस्तारली असून भविष्यात अशाचप्रकारचे बॉंड्स जारी केले जाण्यासाठी किमतींसाठी उत्पन्न आलेखाचा एक नवा मापदंड निर्माण झाला आहे.

१ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेण्याचे वार्षिक उद्दिष्ट

भारतीय रेल्वेच्या वृद्धी, विस्तार आणि आधुनिकीकरणामध्ये आयआरएफसी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चालू आर्थिक वर्षात या कंपनीला १ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेण्याचे वार्षिक उद्दिष्ट आखून देण्यात आले होते. आयआरएफसीकडून भारतीय रेल्वेला गेल्या सहा वर्षात केल्या गेलेल्या वार्षिक वित्त वाटपांच्या सीएजीआरने गेल्या सहा वर्षात जवळपास ४५.७० टक्के स्तर गाठला आहे.

बाह्य व्यापारी कर्जांचा समावेश

देशांतर्गत आणि विदेशी बाजारपेठेतील विविध स्रोतांकडून कर्ज घेऊन वार्षिक उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे, यामध्ये जवळपास ४.०८ बिलियन युएस डॉलर्सच्या एकाच वर्षात घेतल्या गेलेल्या बाह्य व्यापारी कर्जांचा समावेश आहे. बाह्य व्यापारी कर्जांमध्ये कंपनीच्या ग्लोबल मीडियम टर्म नोट प्रोग्रॅम (जीएमटीएन) अंतर्गत रेज-एस / १४४ ए फॉरमॅटमध्ये १० वर्षांच्या कालावधीसाठी ७५० मिलियन युएस डॉलर विदेशी बॉन्ड्सचा समावेश आहे. तसेच यामध्ये ७ ते १० वर्षांसाठी एका आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून विदेशी मुद्रा कर्जामार्फत ३ बिलियन युएस डॉलर्सच्या कर्जाचाही समावेश आहे. १० वर्षांच्या ७५० मिलियन यूएस डॉलर्सच्या बॉन्डला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला व हा बॉन्ड ४ पटींनी जास्त ओव्हरसब्स्क्राईब झाला. आयपीओननंतर ईएमबीआय इंडेक्समध्ये समावेशासाठी कंपनीचे जारी केलेले बॉन्ड्स पात्र नाहीत हे जरी खरे असले तरी कंपनीला २.८०% (१० वर्षे युएसटीवर १६७.५ बीपीएस) इतकी शक्य तितकी जास्त किंमत मिळवणे शक्य झाले आहे.

सेकंडरी बाजारपेठेतील उत्पन्नाच्या वर प्रीमियम या बाजारपेठेच्या नेहमीच्या परंपरेला आयआरएफसीने मिळवलेल्या किमतींमुळे छेद दिला आहे. आयआरएफसीने जारी केलेले बॉन्ड्स हे त्यांच्या स्वतःच्या सूचिबद्ध पेपर्सच्या सेकंडरी बाजारपेठेतील उत्पन्नापेक्षा ७ ते १० बीपीएसने कमी होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!