‘या’ म्युच्युअल फंड्समध्ये करा गुंतवणूक आणि मुलांच्या शिक्षण खर्चामधून व्हा टेंशन फ्री

म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही आतापासून थोडी-थोडी गुंतवणूक केलीत तर तुमचीही चिंता नाहीशी होईल

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली:  आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि त्यांनी उत्तम करिअर करावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. त्यानंतर मुलाचं किंवा मुलीचं लग्न धुमधडाक्यात लावून द्यावं अशीही आईवडिलांची इच्छा असते. सध्या महागाई वाढते आहे. त्यामुळे मुलांची शिक्षणं आणि लग्न हे चिंतेचे विषय होऊन राहिले आहेत. अशावेळी मनात विचार येतो की या मुलांच्या लग्नाच्यावेळी महागाई किती असेल आपला कसा निभाव लागणार? पण चिंता करू नका म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही आतापासून थोडी-थोडी गुंतवणूक केलीत तर तुमचीही चिंता नाहीशी होईल आणि तुम्ही व्हाल चिंतामुक्त.

हेही वाचाः बापरे! 3 वर्षांच्या चिमुकलीला लावलेल्या सलाईनमध्ये चक्क झुरळ

म्युच्युअल फंडातील गुंतवलेली रक्कम काही प्रमाणात शेअर बाजारात गुंतवली जाते त्यामुळे त्यावर चांगलं व्याजही मिळतं. तुम्ही जर आतापासून तुमच्या पाल्याच्या नावे दरमहा फक्त 5 हजार रुपये म्युच्युअल फंडाच्या SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवले तर तुमचा पाल्य 25 वर्षांच्या होईपर्यंत करोडपती होईल. आम्ही काही म्युच्युअल फंड तुम्हाला सुचवत आहोत.

एलआयसी एमएफ चिल्ड्रन फंड

एलआयसीच्या या गिफ्ट फंडाने गेल्यावर्षीच्या तुलनेत 32.78 टक्के जादा रिटर्न दिला आहे. या फंडाने स्थापनेपासून दरवर्षी सरासरी 10.50 टक्के रिटर्न दिला आहे. या फंडात भारत सरकार, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड आणि टाटा कन्सल्टन्सी या दिग्गजांची गुंतवणूक आहे. फंडाचा एक्सपेन्स रेशो 2.45 टक्के असून तो इतर समकक्ष फंडांच्या तुलनेत अधिक आहे. सध्या फंडातील 88.16 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते आणि कर्ज जोखीम 10.50 टक्के आहे.

हेही वाचाः सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणः कळंगुट पोलिसांचे गोमेकॉच्या डीनना पत्र

ॲक्सिस चिल्ड्रल गिफ्ट फंड

सोल्यूशन ओरिएंटेड चिल्ड्रन फंड आहे. यात लॉक इन पिरेड नाही. या फंडाची मार्केट कॅप 643 कोटी रुपये आहे. तुम्ही 365 दिवसांत स्किम रिडिम केली तर तुम्हाला 3 टक्के बोनस मिळतो. 366 आणि 730 दिवसांत रिडिम केलं तर 2 टक्के बोनस तर 731 आणि 1095 दिवसांत रिडीम केलंत तर 1 टक्का बोनस मिळेल. ॲक्सिस चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड स्कीमनी एका वर्षात 36.31 टक्के रिटर्न दिला आहे.

हेही वाचाः ५ ते ७ सप्टेंबरपर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’

एचडीएफसी चिल्ड्रन गिफ्ट फंड

हा हाइब्रीड म्युच्युअल फंड प्लॅन आहे. भारत सरकार, मुथूट फाइनान्स लिमिटेड, लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, पॉवरग्रीड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि कॅथलिक सीरियन बैंक लिमिटेड फंड हे या फंडातील टॉप 6 गुंतवणूकदार आहेत. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट म्युच्युअल फंड स्कीमनी 1 वर्षात 23.68 टक्के रिटर्न दिला आहे.

हेही वाचाः आगामी निवडणूक बाणावली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार

यूटीआई सीसीएफ गुंतवणूक योजना

यूटीआई सीसीएफ- इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा यूटीआई म्युच्युअल फंड सोल्यूशन-ओरिएंटेड – चिल्ड्रन फंड आहे. याची मार्केट कॅप 529 कोटी रुपये आहे. फंडात टॉप 3 गुंतवणूकदार आहेत इंफोसिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक. या फंडाने 1 वर्षात 51.92 टक्के रिटर्न दिला आहे. या फंडाने स्थापनेपासून दरवर्षी सरासरी 15.07 टक्के रिटर्न दिला आहे. फंडात बहुतेक पैसा आर्थिक संस्था, उद्योजग, सेवा, एफएमसीजी आणि ऑटोमोबाइल उद्योगांनी गुंतवला आहे.

यापैकी कुठल्याही फंडात तुम्ही गुंतवणूक करून आपल्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करू शकता. गुंतवणुकीपूर्वी म्युच्युअल फंडाविषयी संपूर्ण माहिती घ्या आणि मगच पैसे गुंतवा.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!