धड्ड्याम! कोरोनाचा फटका, शेअर बाजार हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा सेन्सेक्सवरही परिणाम

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : शेअर बाजार कोरोना महामारीत मोठ्या संख्येनं पडला होता. मोठी उलथापालथ लॉकडाऊनच्या काळात पाहायला मिळाली होती. दरम्यान, सप्टेंबरपासून तेजीत असलेला शेअर बाजार आता पुन्हा एकदा धास्तावला आहे. रुग्णवाढीचा फटका शेअर बाजाराला बसत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

शेअर बाजारात कोरोनानं कहर केलाय. सेन्सेक्स तब्बल हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळलाय. १ हजार ३१५ अंकांनी सेन्सेक्स खाली आलाय. त्यामुळे गुंतवणूकदारही धास्तावले आहे. सध्या सेन्सेक्स ४७,५००च्या आसपास असून अंक खाली-वर होणं सुरु आहे. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळल्यानं गुंतवणूकदार धास्तावलेत. तर दुसरीकडे निफ्टीही ३६५ अंकांनी कोसळलाय.

रुग्णवाढीचा कहर सुरु

एकीकडे शेअर बाजार कोसळला असून अंक खाली घसरत असल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे कोरोना रुग्णवाढीचा वेग महाभयंकर झाल असून दररोजची रुग्णवाढ आता ३ लाखाच्या जवळपास पोहोचू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.

corona update
corona update

गेल्या २४ तासांत राज्यात २ लाख ७३ हजार ८१० नवे रुग्ण आढळून आले. तर तब्बल १६०० पेक्षा जास्त जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १ हजार ६१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशात १ लाख ७८ हजार ७६९ रुग्ण दगावलेत. तर एकूण १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

संपूर्ण देशात गेले काही दिवस सातत्यानं रुग्णवाढ ही अडीच लाखापेक्षा जास्त होताना पाहायला मिळतेय. आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, देशात रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा ८ टक्क्यांवर वाढून १६ टक्के झालाय. हा वेग संपूर्ण देशाच्या आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढवतोय. त्यामुळे मास्क घालणं, आणि सोशल डिस्टन्सिंग मेन्टेन करणं, याला पुन्हा महत्त्व प्राप्त झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!