अर्थसंकल्प 2021 | आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाची वैशिष्ट्य

महामारीत जीव वाचवण्याला प्राधान्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

मोदी सरकार 2.0चा तिसरा आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला आहे. या अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांचे साधारण परिणाम काय होतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. आर्थिक सर्वेक्षण दरवर्षी अर्थसंकल्पासमोर मांडला जातो. या सर्व्हेचा अहवाल सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार म्हणजेच सीईएच्या नेतृत्वाखाली तयार केला जातो.

महामारीत जीव वाचवण्याला प्राधान्य

आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यात मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम यांनी आर्थिक सर्वेक्षण २०२०-२१मधील महत्त्वाच्या गोष्टी उलगडून सांगितल्या. सुब्रमण्यम म्हणाले की…

कोविड महामारीत भारताच्या धोरणावरील आर्थिक सर्वेक्षणातील पहिला अध्याय हा लोकांचा जीव वाचवणे आणि लोकांच्या रोजगारावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, कोविड -१९ लॉकडाऊनमुळे अर्थकारणावर निश्चितच परिणाम झाला. मात्र येत्या काळात त्यात सकारात्मक वाढ होईल.

आर्थिक सर्वेक्षणांची वैशिष्ट्ये:

गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येईल. कमी व्याजदरामुळे व्यवसायाला चालना मिळेल. कोरोना विषाणूच्या लसीमुळे साथीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे आणि पुढील आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी ठोस पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असलेल्या ट्रेंडच्या आधारे वर्षभरात अर्थव्यवस्था घसरण्याची शक्यता आहे.

भारताच्या लॉकडाऊन रणनीतीमुळे महामारीतच कोरोना रुग्णसंख्या ३७ लाखांवर रोखण्यात आली तर एक लाख मृत्यू रोखण्यात आलेत.

सर्वेक्षणानुसार, 17 वर्षांच्या अंतरानंतर वित्तीय वर्षात चालू खात्यातील अतिरिक्त बचतीकडे भारत पाहू शकेल. 

आर्थिक वाढीचा परिणाम उत्पन्नातील असमानतेपेक्षा गरीबी हटविण्यावर जास्त होतो. गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी भारताने विकासावर भर देण्याची गरज आहे.

सार्वजनिक आरोग्याचा खर्च एक टक्क्यांवरून दोन टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

23 डिसेंबर 2020 पर्यंत, भारत सरकारने 41,061 स्टार्टअप्सला मान्यता दिली.

देशभरात 39,000 हून अधिक स्टार्ट अप्सने 4,70,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा – वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय?

आर्थिक सर्वेक्षण हा गेल्या एक वर्षाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा सविस्तर अहवाल असतो. ज्यात अर्थव्यवस्थेशी संबंधित मुख्य आव्हाने काय आहेत, याचा आढावा घेतला जातो. त्याचप्रमाणेत्यास कसे सामोरे जावे लागेल, याबाबतही चर्चा केली जाते. हा अहवालमुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व्यवहार विभागाकडून तयार केला जातो.

आर्थिक सर्व्हेचे महत्त्व काय?

आर्थिक सर्व्हेचे देशाची आर्थिक स्थिती दर्शवतो. आर्थिक सर्वेक्षण पैशांचा पुरवठा, पायाभूत सुविधा, कृषी आणि औद्योगिक उत्पादन, रोजगार, किंमती, निर्यात, आयात, परकीय चलन साठा तसेच अन्य संबंधित आर्थिक घटकांचे विश्लेषण करतो.  हा दस्तऐवज सरकारचा सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे, जो अर्थव्यवस्थेच्या प्रमुख चिंतेवरही लक्ष केंद्रीत करतो.

हेही वाचा – घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!