आयएचसीएलने केली विवांता गोवा मिरामारच्या शुभारंभाची घोषणा

एकूण ७७ खोल्यांचे विवांता गोवा, मिरामार कलोनियल काळाची आठवण करून देणारे

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः दक्षिण आशियातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसीएल) पणजीमध्ये विवांता गोवा, मिरामार येथे सुरु होत असल्याची आज घोषणा केली. अतिशय शैलीबद्ध पद्धतीने रचना करण्यात आलेले हे हॉटेल मिरामार समुद्रकिनारी, अरबी समुद्राच्या विहंगम दृश्याच्या पार्श्वभूमीवर विवांता गोवा, मिरामार दिमाखात उभे आहे.

आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल यांनी सांगितलं, गोव्याचा आणि आयएचसीएलचा स्नेह अतिशय घनिष्ठ आहे. चार दशकांहूनही आधी आम्ही या राज्यात आलो. आता हे हॉटेल सुरु करून आमच्या कंपनीने विस्ताराचे आणखी एक पुढचे पाऊल उचलले असून या निसर्गरम्य राज्यामध्ये आमच्या पोर्टफोलिओत ठिकठिकाणी असलेली, विविध ब्रँड्सची २० हॉटेल्स आणि बंगल्यांचा समावेश आहे.

एकूण ७७ खोल्यांचे विवांता गोवा, मिरामार कलोनियल काळाची आठवण करून देणाऱ्या परिसरात असून, रमणीय समुद्रकिनाऱ्याची उत्तम साथ त्याला लाभलेली आहे. या हॉटेलमधून समुद्रकिनारा अगदी सहज गाठता येतो. कला, संस्कृती आणि नाईटलाईफ ही येथील सर्वोत्कृष्ट आकर्षणे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पणजी शहराच्या मुख्य भागापासून हे हॉटेल अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. हॉटेलची रचना आधुनिक पद्धतीची असून पाहताक्षणी तन व मन तजेलदार आणि उत्साही करेल असे एकंदरीत वातावरण आहे. मिंट या संपूर्ण दिवसभर सेवा पुरवणाऱ्या डायनरमध्ये जागतिक मेन्यूचा आस्वाद घेता येतो, तर रुफटॉप पुलसाईड बार सनडाऊनर्ससाठी अगदी मनाजोगते ठिकाण आहे. या हॉटेलमध्ये एक मीटिंग रूम आहे, शिवाय रुफटॉप टेरेस देखील येथून दिसणाऱ्या मनोहारी दृश्यांमुळे मीटिंग्स व इतर कार्यक्रमांसाठी उत्तम आहे.

विवांता गोवा, मिरामारचे हॉटेल मॅनेजर सुहाश बोस यांनी सांगितलं, पर्यटकांची आवडती ठिकाणे आणि शहराच्या मुख्य भागापासून अगदी जवळ असलेले विवांता गोवा, मिरामार सुट्टीसाठी आणि कामासाठी आलेल्या दोन्ही प्रकारच्या पाहुण्यांसाठी अतिशय सोयीस्कर आणि छान आहे. गोव्यातील या आमच्या नवीन हॉटेलमध्ये पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

पर्यटकांच्या जागतिक आणि देशांतर्गत नकाशावर गोव्याचे स्थान अतिशय ठळक आणि खूप आवडीचे आहे. सफेद वाळूने आच्छादलेले समुद्रकिनारे, वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप, वेगवेगळ्या चवींची स्वादिष्ट मेजवानी, अनेक अनुभवांचा नजराणा, विविध मंदिरे, जागतिक वारसा यादीतील वास्तुकला आणि या सर्वांच्या बरोबरीने पदोपदी आपली सोबत करणारा समृद्ध निसर्ग अशी संपत्तीची उधळण करणारे गोवा प्रत्येक पर्यटकाला खुणावत असते.

हे हॉटेल सुरु झाल्यामुळे आता आयएचसीएलच्या पोर्टफोलिओमध्ये गोव्यात २० हॉटेल्स आणि बंगले आहेत, यामधील दोन ठिकाणी काम सुरु आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!