‘एक नयी मुस्कान’नं कसं बदललं 8 वर्षीय मुनमुनचं आयुष्य…

हिमालया ड्रग कंपनीचा उपक्रम, ओठ व टाळूवरील उपचारांबाबत जागरुकता

Goan Varta Live | प्रतिनिधी

भोपाळः भारतातील आघाडीची वेलनेस कंपनी असलेल्या हिमालया (Himalaya) ड्रग कंपनीनं जागतिक हास्यदिनाचं औचित्य साधून आपला फ्लॅगशिप सामाजिक प्रभाव उपक्रम मुस्कान मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये सुरू केलाय ओठ आणि टाळूशी संबंधित व्यंगांबाबत (क्लेफ्ट) जागरूकता निर्माण करणं या अभियानाचं उद्दिष्ट आहे. स्माइल ट्रेन या जगातील आघाडीच्या क्लेफ्ट संस्थेच्या सहयोगातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम गरजू मुलांना प्राणरक्षक क्लेफ्ट उपचार मोफत पुरवण्यास मदत करेल.

हृदयस्पर्शी व्हिडिओसह या अभियानाची सुरुवात
“एक नयी मुस्कान” या अभियानाच्या माध्यमातून हिमालया लिप केअर फाटके (क्लेफ्ट) ओठ व टाळूवरील उपचारांबाबत अगदी तळागाळापर्यंत जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. आठ वर्षांच्या मुनमुनची प्रेरणादायी कथा सांगणा-या हृदयस्पर्शी व्हिडिओसह या अभियानाची सुरुवात करण्यात आलीय. सुरक्षित क्लेफ्ट सर्जरीद्वारे मुनमुनचे आयुष्य कसं बदललं याचे चित्रण ही फिल्म करते.

“एक नयी मुस्कान आमच्या हृदयाच्या जवळचं अभियान आहे. हिमालयाच्या माध्यमातून ख-या अर्थानं लोकांची आयुष्यं बदलण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतो. स्माइल ट्रेन इंडियाशी झालेल्या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही गेली पाच वर्षं लहान मुलांच्या क्लेफ्ट सर्जरीज मोफत करण्यात मदत करून भारतभरातील अनेक कुटुंबांच्या चेह-यावरील हास्य परत आणत आहोत. मुलांची आयुष्यं बदलून टाकण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील.
राजेश कृष्णमूर्ती, संचालक उत्पादन विभाग

क्लेफ्टबद्दल तसेच मोफत क्लेफ्ट उपचारांबद्दल माहिती घेण्यासाठी स्माइल ट्रेन इंडियाची टोल फ्री क्लेफ्ट हेल्पलाइन, 1800-103-8301 उपलब्ध आहे.

भारतात दरवर्षी 35,000 हून अधिक बाळं फाटक्या ओठासह जन्माला येतात. त्यामुळे त्यांच्या वाढीच्या क्षमतेवर मोठा परिणाम होतो. उपचार न मिळालेल्या क्लेफ्टमुळं खाण्यात, श्वसनात, ऐकण्यात तसेच बोलण्यात अडचणी येतात. क्लेफ्टवर अत्यंत सुरक्षित शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करता येतात. हिमालया ड्रग कंपनीसोबत झालेल्या सहयोगाचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीनं क्लेफ्टसह जगणा-या अनेक मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवलं आहे
ममता कॅरोल, स्माइल ट्रेनच्या आशिया प्रादेशिक संचालक

यावर्षीच्या अभियानाला अर्जुन पुरस्कार विजेत्या तसेच राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू गीता फोगट यांनी पाठिंबा दिला आहे.

हिमालया हा लिप केअर विभागातील आघाडीच्या ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. प्रत्येक लिप केअर उत्पादनाच्या विक्रीतून मिळणा-या उत्पन्नापैकी 3 रुपये मुस्कानसाठी वळवले जातात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!