सलग सातव्या वर्षी ‘ही’ बँक ठरली पहिल्या क्रमांकाचा ब्रॅन्ड

हे रँकिंग कांटर मिलवर्ड ब्राऊन या ग्लोबल कम्युनिकेशन सर्व्हिसेस बेहोथ असलेल्या डब्ल्यूपीपीच्या ग्रुप कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानंतर करण्यात आले आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : एचडीएफसी (HDFC) बँकेचा ‘इंडियाज मोस्ट व्हॅल्यूबएल ब्रॅन्ड’ म्हणून सलग सातव्या वर्षी सन्मान करण्यात आला आहे. ‘2020 ब्रॅन्ड्झ टॉप 75 मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रॅन्ड्स’ या सर्वेक्षणाअंतर्गत एचडीएफसी बँकेचे 20.3 बिलियन डॉलर्स मूल्यांकन झाले आहे. एचडीएफसी बँकेच्या ब्रॅन्डचे मूल्य गेल्या 7 वर्षांत सातत्याने वाढत असून 2014 मध्ये ते 9.4 बिलियन डॉलर्स इतके होते, ते वाढून 2020 मध्ये 20.3 बिलियन डॉलर्सवर पोहोचले. यावर्षीच्या सर्वेक्षणात 3.8 दशलक्ष भारतीय ग्राहकांनी भाग घेऊन 89 विभागांतील 1140 भारतीय ब्रॅन्ड्सचे नामांकन केले होते.

ब्रॅन्ड्सतर्फे जारी करण्यात आलेल्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, एचडीएफसी बँकेने सातत्याने आपली वित्तीय कार्यक्षमता आणि ग्राहकांचा अनुभव वाढवण्यात यश मिळवले असून 2020 ब्रॅन्ड्झ टॉप 00 मोस्ट व्हॅल्युएबल ग्लोबल ब्रॅन्ड्स रिपोर्टमध्ये 59 वा क्रमांक प्राप्त केला आहे. हे रँकिंग कांटर मिलवर्ड ब्राऊन या ग्लोबल कम्युनिकेशन सर्व्हिसेस बेहोथ असलेल्या डब्ल्यूपीपीच्या ग्रुप कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानंतर करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर ब्रॅन्ड्सची खरी परीक्षा ही साथीच्या आजारांनंतर दिसून आली; कारण भारतासारख्या देशात कोविड-19 ची साथ सुरू होण्यापूर्वीही मंदीचे ढग होते, असे ब्रॅन्ड्झचे चेअरमन आणि स्टोअर डब्ल्यूपीपी ईएमईएचे सीईओ डेव्हिड रॉथ यांनी सांगितले. अनेक भारतीय ब्रॅन्ड्सनी हे आव्हान पेलले आणि नाविन्याचा उपयोग करून त्यांची क्षमता वाढवून ते जागतिक स्तरावरील असल्याचे सिद्ध केले. आमच्या संशोधनातून असे दिसून येते की, पुन्हा एकदा अशा कंपन्या पुढे आल्या ज्यांनी सातत्याने ब्रॅन्ड तयार करण्यात गुंतवणूक केली, ज्यामुळे ते आता आव्हानात्मक स्थितीतही टिकून राहून अधिक सक्षमपणे पुढे आले आहेत.

एचडीएफसी बँक ही सलग सहा वर्षे टॉप 100 ग्लोबल ब्रॅन्ड्स लिस्टमध्ये झळकली आहे. अमेझॉन पहिल्या क्रमांकावर असलेल्या या प्रतिथयश नामांकनामध्ये एचडीएफसीने एक पायरी पुढे जात यावर्षी 60 व्या क्रमांकावरून 59 व्या क्रमांकावर आपली मजल मारली आहे. पहिल्या 10 ब्रॅन्ड्समध्ये अनुक्रमे पल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, विजा, अलिबाबा, टेन्सेन्ट, फेसबुक, मॅकडॉनल्ड्स, मास्टरकार्ड यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!