आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीचे दर घसरले! खरेदीची सुवर्णसंधी

सोने चांदीच्या दरातील घसरण सुरुच

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ६५० रुपयांनी कमी झालाय. त्यामुळे सोन्याचे दर प्रतितोळा ४६ हजारांखाली आलेत. चांदीच्या दरांमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. तब्बल १३०० रुपयांची घसरण चांदीच्या दरांमध्ये झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३ हजार ९४० रुपये झाला आहे.

हेही वाचा – SHOCKING VIDEO | हत्येचा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद

किती रुपयांनी स्वस्त?

सलग दुसऱ्या सत्रात सोनं आणि चांदीला विक्रीची झळ बसल्याचं दिसून आलं आहे. याआधी शुक्रवारी सोनं ९५२ रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदीमध्ये २ हजार २३ रुपयांची घसरण झाली होती. दोन सत्रात सोने १ हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे ही सोनं खरेदीची योग्य वेळ असल्याचं जाणकारांचं म्हणणंय.

सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४५ हजार ९५६ रुपये इतका आहे. त्यात ६५० रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३ हजार ६१४ रुपये आहे. त्यात १ हजार ३८६ रुपयांची घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचे दर ४६ हजार ६५१ रुपयांवर स्थिरावले होते. त्यात ९५२ रुपयांची घसरण झाली होती. त्याआधी सोन्याचा भाव ४६ हजार ५५६ रुपयांपर्यंत खाली आला होता. सोन्याबरोबरच शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव तब्बल २ हजार रुपयांनी स्वस्त झाला. हा दर ६५ हजारांच्या खाली आला होता.

हेही वाचा – सपासप कुऱ्हाडीनं वार करत अनवर शेख रक्तबंबाळ, हत्येचा धक्कादायक Video Viral

कुठे किती दर?

सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५ हजार ६९० रुपयांपर्यंत खाली घसरला. २४ कॅरेटचा भाव ४६ हजार ६८० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५ हजार ९८० रुपये इतका झालाय. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५० हजार १६० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४ हजार ३८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ४२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ३३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार ३० रुपये आहे. गोव्यात 22 कॅरेटसाठी हाच दर 44 हजार 810 तर 24 कॅरेटसाठी हाच दर 47 हजार 920 रुपये इतका आहे.

हेही वाचा – अर्थसंकल्पातील 10 इंटरेस्टिंग योजनांची घोषणा, ज्याचा होणार सर्वसामान्यांनाही फायदा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!