पर्यावरणाच्या बाबतीत नवी पिढी अधिक सजग

गोदरेज समूहाच्या'लिटील थिंग्ज वुई डू' या अभ्यासातील निष्कर्ष

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः कोवि़ड-१९ महामारीमुळे गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाऊनला भारतातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी आपापल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनी हाताळलं, असं गोदरेज समूहाच्या ‘लिटील थिंग्ज वुई डू’ या अभ्यासात आढळून आलं आहे. यातील जेन एक्स म्हणजे वय वर्षं ४५ आणि त्यापुढील गटातले (५९%) आणि जेन झेड (५३%) म्हणजेच १८ ते २४ या वयोगटातील बहुसंख्य लोक सॅनिटायझर्सचं वितरण आणि गरज असणाऱ्यांना अन्नपदार्थांची पाकिटे, जुने कपडे, ब्लॅंकेट्स किंवा औषधं आणि वैद्यकीय साधनांचं वितरण करत होते. त्यांचा कल निष्काम कर्मयोगासारखा निरपेक्ष भावनेने काम करण्याकडे दिसून आला.

हेही वाचाः म्हापशाचे माजी नगरसेवक मार्टिन कारास्को यांचं निधन

तरुण पिढी (५४%) पैकी बहुसंख्य जण हे पर्यावरणाप्रती सजग असल्याचे त्यांनी त्यांच्या कृतीवरून दाखवून दिलं. तरुण पिढीच्या वयोगटाचे पुढे जाऊन आणखी वर्गीकरण केल्यानंतर असं दिसून आलं की २५ ते ३४ या वयोगटातील अधिक तरुण पिढी ही सर्व प्रकारच्या वयोगटात पर्यावरणाप्रती सर्वात जास्त सजग होती. ५४.८३% जणांनी घरात झाडं लावणं, ऊर्जा वापराबद्दल सजगता दाखवली आणि आपण खरेदी करत असलेल्या उत्पादनांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो याला महत्व दिलं.

हेही वाचाः एक मोदी आणि अर्धे अमित शहा…केवळ दीड माणसं चालवताहेत केंद्र सरकार !

गोदरेज समूहातर्फे लिटील थिंग्ज वुई डू हे संशोधनात्मक सर्वेक्षण करण्यात आलं. छोट्या छोट्या गोष्टीतले आपलं योगदान आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा चिरकाल टिकणारा ठसा सोडून जातो यावर यात प्रकाशझोत टाकण्यात आला. तरुण पिढीमध्ये पाचपैकी जवळपास तीन जण (५९%) निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योगा, झुम्बा, चालणं किंवा ध्यानधारणा यासारखा शारीरिक वा मानसिक व्यायाम करत होते. त्याचवेळी सगळ्याच वयोगटात अगदी कमी टक्केवारीत लोकांनी धुम्रपान, अति खर्चिकपणा, फास्ट फूड आणि मद्यपान या गोष्टी सोडल्या.

हेही वाचाः कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना थेट प्रवेश? आज सुनावणी

सर्वेक्षण केलेल्यांपैकी फक्त ३६% प्रतिसादकांनी त्यांनी चुकीच्या सवयी सोडल्याचं सांगितलं. जेन झेड यामध्ये सर्वात कमी (३४%) आणि त्याखालोखाल जेन एक्स (३५%) होते. लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे घरचं पौष्टिक अन्न खाल्लं गेलं याबद्दल जरा मोठी तरुण पिढी (७५%) आणि जेन एक्स (७७%) यांच्या तुलनेत जेन झेड आणि तरुण पिढीतला लहान वयोगट (७४%) यामधल्या प्रतिसादकांचं एकमत झालं.

हेही वाचाः श्रीपादभाऊंना बंदरे, पर्यटन तर नारायण राणेंकडं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग

गोदरेजचे उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट ब्रँड आणि कम्युनिकेशन्सचे समूह प्रमुख (ग्रुप हेड) सुजित पाटील यांनी या संशोधन सर्वेक्षणाचे वर्णन करताना हे संशोधन म्हणजे कठीण काळात वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या ग्राहकांच्या मनात डोकवून पाहणं होतं असं सांगितलं. ते म्हणाले, सध्याच्या महामारीने भारतीयांच्या एकूणच जीवनशैलीवर आणि इच्छा आकांक्षांवर परिणाम केला आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या आयुष्यात ‘छोटे छोटे’ बदल करायला सुरुवात केली. काही वयोगटांनी स्वतःच्या कामातून नि:स्वार्थ, निरपेक्ष भावना दर्शवली तसंच काहीजणांनी स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला.

हेही वाचाः आजपासून जनसुनावणी! मग पणजीत गाडी कुठे पार्क कराल?

ते पुढे म्हणाले, की हातांचे निर्जंतुकीकरण आणि निगडीत उत्पादनांच्या क्षेत्रात आणखी सुधारणा घडून येण्यास खूप वाव आहे. कारण केवळ ८६% प्रतिसादकांनी निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी ते नियमीतपणे हात धुवत असल्याचं आणि गोष्टी निर्जंतुक करत असल्याचं सांगितलं आहे. हे प्रमाण वाढण्यासाठी आणि आगामी काळात व्यक्तिगत स्वच्छतेचं प्रमाण आणखी उंचावण्यासाठी आपण सर्वांनी लक्षपूर्वक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचाः माझी पत्नी आगामी निवडणुक लढवण्यास इच्छुकः मायकल लोबो

या अभ्यासानुसार, लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे मनोरंजन आणि कुटुंबाबरोबर अधिक वेळ मिळाल्याचेही समोर आलं. प्रतिसादकांपैकी पाव पेक्षा जास्त (२७.३५%) लोकांनी कुटुंबाबरोबर वेळ घालवताना आणि कार्यक्रम बघताना (२६.५९%)समाधान मिळाल्याचं सांगितलं. जवळपास पाव (२३.१९%)प्रतिसादकांनी वाचनात किंवा संगीत ऐकण्यात वेळ घालवणं पसंत केल्याचं सांगितलं. प्रत्येक पाच पैकी एका व्यक्तीने सकारात्मक ऊर्जा मिळविण्याचा एक भाग म्हणून स्वयंपाक करायला सुरु केल्याचं सांगितलं.

हेही वाचाः क्रेडिट कार्ड वापरा, पण प्रत्येक ठिकाणी नाही; जाणून घ्या आरबीआयचे नियम

लॉकडाऊनमध्ये सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी जेन एक्स मधल्या जवळपास ३३% लोकांनी कुटुंबाबरोबर वेळ घालवणं, त्याखालोखाल ओटीटी वरील कार्यक्रम आणि टीव्ही कार्यक्रम बघणे (२१%), संगीत ऐकणं किंवा पुस्तक वाचणं (२३%) याला पसंती दिल्याचं सांगितलं. याउलट इतर वयोगटातील लोकांनी ओटीटी वरील कार्यक्रम बघणे किंवा संगीत ऐकणं हे त्यांच्या आनंदाचे मार्ग असल्याचं नमूद केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!