‘फिनकेयर स्मॉल फायनान्स बँके’तर्फे गोव्यात कामकाज सुरू

पणजी येथे पहिली शाखा कार्यान्वित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक या वेगाने विकसित होत असलेल्या लघु वित्त बँकेने निसर्गसौंदर्य, अनोखे समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक वैविध्यता असलेल्या राजधानी शहरात- पणजी येथे पहिली शाखा सुरू केली आहे. या लाँचमुळे फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यवसाय विस्तार केला आहे.

गोंयकारांची आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी आम्ही बांधील

बँकेच्या शाखेचे उद्घाटन करताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव यादव म्हणाले, गोव्यातील लोकांची आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी आम्ही बांधील असून त्यासाठी नाविन्यपूर्ण बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असेल. ही उत्पादने मासेमारीसह गोव्यातील प्रमुख व्यवसाय क्षेत्रे, शेती, पर्यटन आणि औषध क्षेत्राला आपली कामगिरी उंचावण्यासाठी मदत करतील. या प्रदेशातील एनआरआय ग्राहकवर्गाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्टही आम्ही ठेवले असून त्यांना ठेवींवर अधिक चांगला व्याजदर व सफाईदार बँकिंग अनुभव दिला जाईल.

बँक पसंतीची फिनकेयर पुरवठादार ठरली

फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेने विविध प्रकारच्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्मार्ट बँकिंग सेवा देण्याचे ठरवले असून त्यामुळे बँक पसंतीची फिनकेयर पुरवठादार ठरली आहे. वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी, उच्च व्याजदर, अधिक कार्यक्षम करंट अकाउंट्स आणि स्वीप इन- स्वीप आउट सुविधा, विविध प्रकारची कर्ज उत्पादने फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेच्या पणजीतील शाखेत मिळतील. व्यवहारांना युनिफाइड पेमेंट इंटरफेजचा (युपीआय) मिळणारा पाठिंबा हे बँकेद्वारे पुरवली जाणारी आणखी एक सेवा आहे.

३१ मार्च २०२२ पर्यंत बँकेने १९ राज्यांतील ३२ लाखपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली असून तिची कर्मचारी संख्या १२,००० पेक्षा जास्त आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!