FINANCE VARTA | हेल्थ किंवा लाईफ इन्शुरेंस नंतर आता आला आहे ‘जॉब लॉस इन्शुरेंस’, जाणून घ्या काय आहेत, या योजनेचे फायदे आणि तोटे
तुम्ही हेल्थ आणि लाइफ इन्शुरेंस घेतला असेलच, पण जर तुम्हाला 'जॉब लॉस इन्शुरेंस' माहिती असेल तर बरेच टेन्शन दूर होईल. जॉब लॉस इन्शुरेंस'बद्दल येथे तपशीलवार जाणून घ्या.

ऋषभ | प्रतिनिधी

‘जॉब लॉस इन्शुरेंस’ पॉलिसी: आजकाल तुम्ही जिकडे पाहाल तिकडे कंपनीत ले ऑफ चालू आहेत. अशा परिस्थितीत, घरखर्च, मुलांची फी आणि ईएमआयचे विचार हे नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तणावपूर्ण ठरतायत . पण तुम्हाला माहित आहे का की अशा परिस्थितीत तुम्हाला ‘जॉब लॉस इन्शुरेंसमधून’ दिलासा मिळू शकतो. आता हा जॉब लॉस इन्शुरेंस’ म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
जॉब लॉस इन्शुरेंस म्हणजे काय ?
हा जीवन आणि आरोग्य विम्यासारखाच असतो. यामध्ये नोकरीसाठी गेल्यास आर्थिक फायदा होतो. भारतात जॉब लॉस इन्शुरेंसची कोणतीही वेगळी अशी योजना नाही. जॉब लॉसइन्शुरेंस मिळवण्यासाठी जर्नल आणि टर्म इन्शुरन्स सोबत जोडला जातो.

जॉब लॉस इन्शुरेंसबाबत प्रत्येक विमा कंपनीच्या वेगवेगळ्या अटी असतात. कोणतीही पॉलिसी घेण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी नीट वाचायला विसरू नका. पॉलिसीचा दावा कोणत्या परिस्थितीत केला जाऊ शकतो यासंबंधी काही अटी आहेत. जर तुमची नोकरी सोडण्याचे कारण त्यांच्या यादीत समाविष्ट केले असेल, तरच पॉलिसीधारकाला ठराविक कालावधीसाठी मदत मिळते. म्हणजेच तुम्ही विमा संरक्षणाचा दावा करू शकता.
जॉब लॉस इन्शुरेंसशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
- पॉलिसीधारकाला नोकरी गेल्यावर ठराविक कालावधीसाठी विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळते.
- जॉब लॉस इन्शुरेंससाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न नियमित असले पाहिजे. तसेच तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या कंपनीची नोंदणी केलेली असावी.
- कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्यांनाच या पॉलिसीचा लाभ मिळतो. तुमची नोकरी कंत्राटी किंवा तात्पुरती असेल तर तुम्हाला या पॉलिसीचा कोणताही लाभ मिळणार नाही.
- खराब कामगिरीमुळे तुम्हाला काढून टाकल्यास या पॉलिसीचा काहीही उपयोग होणार नाही.
- तुम्ही प्रोबेशन कालावधीत तुमची नोकरी गमावली तरीही तुम्ही विम्याचा दावा करू शकत नाही.
- नोकरी गमावल्यास विमा कंपनी किती संरक्षण देते हे कंपनी ठरवते. त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी टर्म आणि कंडिशन काळजीपूर्वक वाचा.
- जर तुम्हाला कोणत्याही चुकीच्या क्रियाकलाप आणि भ्रष्टाचारामुळे कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल, तर अशा परिस्थितीतही तुम्ही विमा संरक्षणाचा दावा करू शकत नाही.

हेही वाचाः उष्णतेच्या लाटेचा गोव्याला धोका कमी : हवामान खाते