EPFO CIRCULAR | अधिक पेन्शनच्या गोंधळात सापडला आहात ? तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील , फक्त हे काम ३ मे पर्यंत करा

ऋषभ | प्रतिनिधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एक परिपत्रक जारी केले आहे ज्यामध्ये सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याबद्दल माहिती दिलीये . या परिपत्रकात तुम्हाला अधिक पेन्शनसाठी अर्ज कसा करावा लागेल याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अर्ज फेटाळला गेल्यास किंवा फॉर्म भरण्यात चूक झाल्यास काय करावे हे देखील संगितले आहे.
अधिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही 3 मे पर्यंत अर्ज करू शकता.
कोण अर्ज करू शकतो?
संघटित क्षेत्रातील कर्मचारी ज्यांचे मूळ वेतन अधिक DA रु 15,000 पेक्षा कमी आहे आणि 1 सप्टेंबर 2014 किंवा त्यापूर्वी EPF चे सदस्य आहेत, ते यासाठी अर्ज करू शकतात.
फॉर्म चुकीचा भरला तर काय होईल?
जर तुम्ही EFPO मध्ये अतिरिक्त पेन्शन फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरला असेल आणि पडताळणी दरम्यान माहिती जुळत नसेल, तर EPFO तुम्हाला आणखी एक संधी देते. महिन्याभरात पुन्हा योग्य माहिती द्यावी लागेल.
अर्ज नाकारल्यास काय करावे?
EPFO कडून अधिक पेन्शन मिळवण्यासाठी तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. याचे कारण शोधून काढल्यानंतर महिनाभरात तुम्ही ते पुन्हा सादर करू शकता. EPFO स्वतः तुमच्या नियोक्त्याकडून तुमची माहिती घेऊ शकते. यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.

संयुक्त अर्जावर काय होईल?
जर तुम्ही EPFO मध्ये उच्च निवृत्ती वेतनासाठी संयुक्त अर्ज केला असेल . तुम्ही दिलेली माहिती स्थानिक EPFO वर पडताळणी केल्यानंतर EPFO च्या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळवली जाईल. तुमची सध्याची शिल्लक तपासल्यानंतर, अधिक पेन्शन मिळवण्यासाठी तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
जास्त पेन्शन निवडण्याचा काय परिणाम होईल?
सध्या, जर एखाद्याचा पगार 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर नियोक्त्याने दिलेल्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के पेन्शन फंडात आणि 3.67 टक्के पीएफमध्ये जमा केले जातात. उच्च निवृत्ती वेतनाची निवड केल्यानंतर , नियोक्त्याचे पीएफमधील योगदान निम्म्यावर म्हणजे 1.835 टक्क्यांपर्यंत खाली येईल.