जीएचडीच्या आँर्चिड होम्सचा शुभारंभ

दोडामार्ग गिरोडेत आँर्चिड होम्सचे भूमिपूजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्गः शहरातील वाढते प्रदूषण, दगदगीचे जीवन या साऱ्यापासून अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवायला प्राधान्य देत आहेत. गोवा व महाराष्ट्रात विशेषतः निसर्गाचे वरदान लाभलेला भाग म्हणजे तळकोकण. याच पार्श्वभूमीवर विशेषतः संपूर्ण जगाला जैवविविधतेने वेड लावणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, याच सह्याद्रीच्या कुशीत आता एक आलिशान घरांचा प्रकल्प गोव्यातील वास्तू उभारणीत आघाडीवर असलेल्या जीएचडी इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपनीने आणलाय.

दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावात लक्झरी साधन सुविधा उपलब्ध असणाऱ्या “आँर्चिड होम्स” या दर्जेदार गृहवास्तू प्रकल्पाचा मंगळवारी शुभारंभ झाला. कंपनीचे एमडी भारत ठाकरन यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलंय. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात साकारणाऱ्या या प्रकल्पात आपलं हक्काचं टूमदार घर घेण्याची संधी गोवा व महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील लोकांना निर्माण झालीये.

वझरे गावी अत्यंत लक्झरी असा आंगण प्रकल्प साकारल्यानंतर आता लागलीच जीएचडी दुसरा ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील आलिशान घर देण्यासाठी आँर्चिड होम्स हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे कंपनीचे सर्वेसर्वा भारत ठाकरन यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या शुभारंभ कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. बिल्डर व इंजिनिअर यशवंत आठलेकर, वाझरे गिरोडे सरपंच लक्ष्मण गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत, हेवाळेचे माजी सरपंच संदीप देसाई, कंपनीचे सहकारी सुनील गवस आदींनी या प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.

गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर तळकोकणात साकारत असलेला हा प्रकल्प दोडामार्ग तालुका ठिकाणापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर जागतिक पर्यटनात अग्रेसर असलेला गोवा व गोव्याचे समुद्रकिनारे, मोपा विमानतळ अवघ्या अर्धा तासाच्या अंतरावर आहे, रेल्वेस्टेशनसुद्धा हाकेच्या अंतरावर असल्याने निसर्गाच्या सानिध्यात साकारणाऱ्या या आलिशान प्रकल्पाला सुरवातीपासूनच उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास जीएचडीचे मार्केटिंग हेड अभिषेक नंदवना यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!