रेझिंग द बार उपक्रमाला पहिल्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : गोव्यातील 65 हून अधिक हॉस्पिटॅलिटी उद्योग मालकांनी डिऍजिओ इंडियाच्या ‘रेझिंग द बार’ रीव्हायवल ऍण्ड रीकव्हरी प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्यासाठी नोंदणी केली. गोव्यातील 65 हून अधिक रेस्तराँ, पब्स आणि बार्सनी डिऍजिओ इंडियाच्या ‘रेझिंग द बार’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात व्यवसाय पुनरुज्जीवन साह्यासाठी नोंदणी केली आहे.
आसाम, चंदीगढ, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून नोंदणी झाली आहे. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल होत असताना आणि सणासुदीचा काळ सुरू झालेला असताना व्यवसायांनीही हळूहळू आपल्या ग्राहकांसाठी दारे पुन्हा एकदा खुली केली आहेत. कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण पुरवणे आणि त्याचवेळी ग्राहकांना सुरक्षित परिसर पुरवणे याला व्यवसायात सध्या सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. ‘रेझिंग द बार’ या कार्यक्रमातून पात्र आऊटलेट्सना बळकट ऑन-द-ग्राऊंड पाठबळ पुरवून साह्य केले जात आहे. भौतिक साधनांची उपलब्धता आणि सॅनिटायझर डिस्पेंसर्स, मेडिकल ग्रेड हँड सॅनिटायझर्स आणि मास्क आणि ग्लव्हस अशी विविध प्रकारची पर्सनल प्रोटक्शन इक्विपमेंट असलेल्या ‘हायजिन किट्स’चा पुरवठा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत भागीदारीतील आस्थापनांना ऑनलाइन रीझर्व्हेशन आणि कॅशलेस सिस्टम, मोबाइल बार्स आणि आऊटडोअर इक्विपमेंटचीही सुविधा पुरवली जात आहे.
पहिल्या टप्प्याच्या यशाबद्दल डिऍजिओ इंडियाच्या लक्झ्युरी कमर्शिअल ऍण्ड की अकाऊंट्स विभागाच्या उपाध्यक्ष श्वेता जैन म्हणाल्या,
विविध विभागातील हॉस्पिटॅलिटी आणि एफऍण्डबी उद्योगात डिऍजिओ नेहमीच एक दमदार भागीदार राहिला आहे. ग्राहकांना पुन्हा सामाजिक स्तरावर सक्रिय होण्याचा आणि त्यांच्या आवडत्या जागांवर परतण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी या क्षेत्राने केलेल्या उपाययोजना आणि उचललेली पावले यांचे आपणा सर्वांनाच कौतुक आहे. एफ ऍण्डबी क्षेत्र आता सेवा/कार्यचलनासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना आम्हीही त्यांना साह्य करावे हे ओघाने आलेच. ‘रेझिंग द बार’ उपक्रमाला पहिल्या टप्प्यात लाभलेला प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत आणि या क्षेत्रात या उपक्रमाला बरीच लोकप्रियता लाभली आहे.
यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात नोंदणी करणाऱ्यांमधील बाएग वेंचर्सचे मालक अजय गौडा म्हणाले,
भारतातील आदरातिथ्य आणि एफऍण्डबी उद्योगाने फारच मोठ्या आव्हानांचा सामना केला आहे. डिऍजिओ इंडियाने नेहमीच या क्षेत्राला आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग मानले आहे. रेझिंग द बार या उपक्रमातून आऊटलेट्सना फायदा होणार आहेच. पण त्याचबरोबर ग्राहकांनाही त्यांच्या आवडत्या रेस्तराँमध्ये परतण्यासाठी साह्य मिळणार आहे. हायजिन किट्स तसेच काँण्टॅक्टलेस डायनिंगसारखी नव्या युगातील तंत्रज्ञानस्नेही पर्याय आणि नॉन-कॅश साह्य पुरवून या उपक्रमाने आजवर फार दमदार पाठिंबा देऊ केला आहे. आऊटलेट्समध्ये लावलेल्या डिजिटल स्क्रीन्स हा तर ‘न्यू नॉर्मल’ स्थितीत उच्च दर्जाचा मेन्यू देण्यासाठीचा फारच नाविन्यपूर्ण पर्याय आहे.
डिऍजिओ इंडियाचा हा उपक्रम म्हणजे जगभरातील शहरांना लाभ देण्याच्या डिऍजिओच्या 100 अब्ज डॉलर्सच्या बांधिलकीचा भाग आहे. भारतात, हा उपक्रम डिऍजिओच्या स्थानिक पातळीवर ब्लेंड केल्या जाणाऱ्या ब्लॅक डॉग या ख्यातनाम स्कॉच व्हिस्कीच्या मालकीचा आहे आणि त्यामार्फत चालवला जातो.