गोव्याच्या सुपुत्राची डेकोरेटिव्ह लायटिंग क्षेत्रात गगनभरारी

दीपक कानुलकर यांच्या कर्तृत्वाचा देशभर डंका

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : खूप स्वप्न डोळ्यांत साठवून एक गोमंतकीय तरुण मायानगरी मुंबईच्या कॉर्पोरेट वर्तुळात शिरकाव करतो. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेनं तिथले बारकावे मोठ्या मेहनतीनं अल्पावधीतच आत्मसात करतो आणि कालांतरानं स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतो. इतकंच नव्हे, तर आपल्या साथीला काही अनुभवी उद्योजकांना घेउन डेकोरेटिव्ह लायटिंग क्षेत्रासह अन्य क्षेत्रात स्वत:चा ब्रँड स्थापन करून त्यातून यशाची शिखरं पादाक्रांत करतो. या गोमंतकीय उद्योजकाचं नाव आहे दीपक कानुलकर.

‘मीमांसा-डीआयटीआयपीएल’च्या वतीने भारताचा पहिलाच ‘प्रिमियम डेकोरेटिव्ह लायइटंग’ ब्रँड लॉन्च झालाय. या ब्रँडच्या एकूण प्रवासात दीपक कानुलकर यांचा सिंहाचा वाटा आहे. डीआयटीआयपीएलच्या व्यवस्थापकीय पथकाचे प्रतिनिधित्व दोन माजी वित्तीय सेवा व्यावसायिक करत आहेत. अमित सेठ आणि हरीदीप सालवन हे अनुभवी व्यावसायिक या ब्रँडचं व्यवस्थापन पाहत असून एचएसबीसी, एआयजी, एचडीएफसी, आयसीआयसीआय यासारख्या वित्तीय सेवा संस्थांचा त्यांना गाढा अनुभव आहे. आशिष नारंग यांना 25 वर्षांचा लायटिंग क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून क्लिप्सल, क्रॉम्प्टन ग्रिव्हज, ओसराम इत्यादी ब्रँड्ससाठी त्यांनी काम केलंय.

कानुलकर यांच्याकडे 27 वर्षांच्या अनुभवाची समृद्ध शिदोरी

दीपक कानुलकर यांना स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स, पब्लिक रिलेशन्स आणि पब्लिक अफेयर्समध्ये 27 वर्षांहून अधिक अनुभव आहे. बॉम्बे चेंबर, सिप्ला, हिंदुजा, कोका-कोला इंडिया, टाटा एआयजी, जीआरआय इत्यादी नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी काम केलंय.

गोमंतकीय असल्याचा सार्थ अभिमान..!

दीपक कानुलकर यांचे कुटुंबीय बर्‍याच वर्षांपूर्वी गोव्यातून मुंबईत स्थलांतरित झाले. आपलं मूळ गोव्यात आहे, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. दरवर्षी कानुलकरांच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी ते येतात. आपण मूळ गोमंतकीय असल्यानं नेहमीच आपल्याला या भूमीची ओढ आहे आणि गोव्यात आल्यानंतर मूळ गावी आल्याचा सुखद आनंद आपल्याला मिळतो, अशी प्रतिक्रिया दीपक कानुलकर यांनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना दिली.

सजावटीच्या क्षेत्रात अव्वल बनण्याचं ध्येय…

‘गोवन वार्ता लाईव्ह’शी बोलताना कानुलकर म्हणाले, प्रिमियम सजावटीच्या विभागात कमिर्शिअल, रिटेल, रेस्टॉरंट्स, हस्पिटॅलिटी, हाय-एंड रसिडेन्शियल, आउटडोअर आणि पब्लिक स्पेस यासारख्या क्षेत्रात ‘मिमांसा’च्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे हे डीआयटीआयपीएलचे लक्ष्य आहे.

‘मेक इन इंडिया’अंतर्गत व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न

डीआयटीआयपीएलच्या शासकीय प्रकल्प व ब्रँड इनिशिएटव्ज चालविणारे दीपक कानुलकर यांच्या मते, स्मार्ट सिटीज, संग्रहालये, स्पोर्ट्स स्टेडियम, रिव्हर फ्रंट, उद्याने, विमानतळ इत्यादी सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच पर्यावरणातील विविध क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. आमच्या स्वत:च्या उत्पादनांसह उच्च प्रतीची आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स पुरवून ‘मेक इन इिंडया’ उपक्रमांतर्गत हातभार लावण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सार्वजनिक पायाभूत सुविधांचे सौंदर्यीकरण करण्याच्या प्रक्रियेत यामुळे हातभार लागेल.

डीआयटीआयपीएल-‘मीमांसा’ विषयी…

डेकोरेटिव्ह इनोव्हेशन टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (डीआयटीआयपीएल) ‘मीमांसा’ हा भारताचा पिहलाच प्रिमियम डेकोरेटिव्ह लायटिंग ब्रँड लॉन्च केला. ब्रँडची सुरुवात डिजिटली केली आणि ‘प्रिमियम प्रोजेक्ट असोसिएट्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई, दिल्ली, बेंगलुरू, पुणे, नाशिक या शहरांमध्ये 24 फ्रँचायझीसह 5000 पेक्षा जास्त उत्पादनाचे पोर्टफोलिओ उपलब्ध करून दिले. चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, कोची, लुधियाना या शहरांचाही यात समावेश आहे. डीआयटीआयपीएल एक अत्यंत नाविन्यपूर्ण सजावटीची आणि तांत्रिक लायटनिंग कंपनी म्हणून स्थित असून ऑनलाइन आणि आउटलेटद्वारे दोन्ही स्वरूपांमध्ये ग्राहकांना आपल्या पसंतीच्या लाईट्सची खरदेी करता येईल. मिमासा रेंज हा एक ‘प्रिमियम डेकोरेटिव्ह लायटिंग अँड आर्टिफेक्ट्स’ ब्रँड आहे. यात साध्या लोखंडी धातूपासून ते उच्च चमकदार क्रिस्टल तुकड्यांपर्यंत सामग्रीची संपूर्ण आणि जटिल सामग्रीच्या उत्पादनांचा समावेश आहे, असं कानुलकर म्हणाले.

वितरकांना व्यावसायिक प्रशिक्षण

भारतीय बाजारामध्ये प्रिमियम डिझायनर लायटिंग सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे हे संघटनात्मक आघाडीवर डीआयटीआयपीएलचे ध्येय आहे. ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी आपल्या वितरकांना समृद्ध आधुनिक नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल, असं कानुलकर म्हणाले.

दरम्यान, कंपनीने विविध व्यावसायिक सेगमेंटवर लक्ष केंद्रित केलंय. यात विमानतळ, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, संग्रहालये, पार्क्स, रिव्हर फ्रंट्स, हेरिटेज साइट्स आणि धार्मिक संरचना, रस्ते व पूल, बंदरे आदींसह घरातील एलईडी स्क्रिनचा समावेश आहे.

डीआयटीआयपीएलची सध्या मुंबई, बेंगळुरू आणि दिल्ली इथं कार्यालयं आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!