आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांतीचा ‘डीकोडएआय’चा मानस

10 हजारपेक्षा जास्त शाळांचा सहभाग

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देणारे, शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप ‘डीकोडएआय’ने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी नवीन ‘डीआयवाय’ अर्थात स्वतः कृती करून शिक्षण घेण्याचा मंच सुरू केला आहे. यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी), कॉम्प्युटर व्हिजन (सीव्ही), डेटा सायन्स यांचा समावेश आहे.

पाच लाख यूएस डॉलर्सची गुंतवणूक

‘डीकोडएआय’ ची सुरुवात या वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली. नव्या पिढीला कोडींगची औपचारिक पार्श्वभूमी नसतानादेखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कौशल्ये मिळवता यावीत हे ‘डीकोडएआय’चे उद्दिष्ट आहे. या स्टार्टअपमध्ये सुलतान चांद अँड सन्स (पी) लिमिटेड, एज्युकेशनल पब्लिशिंग हाऊस यांची पाच लाख यूएस डॉलर्सची गुंतवणूक आहे. सध्या 10 हजार पेक्षा जास्त शाळा त्यांच्या नेटवर्कचा भाग असून तेथील प्राथमिक व माध्यमिक वर्गांमधील सर्व विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने हे स्टार्टअप प्रयत्नशील आहे.

कोडिंगची पार्श्वभूमी नसलेल्यांनादेखील शिकणे सोपे

शिक्षण सहजसोपे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा पूर्ण करेल, क्षमतांना वाव देईल, असे करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि कमी कोड/अजिबात कोड नसलेली टूल्स यावर ‘डीकोडएआय’चा भर असतो. त्यामुळे कोडिंगची काहीही पार्श्वभूमी नसलेल्यांना देखील एआय मॉडेल्स शिकण्याची व ती वापरण्याची सुरुवात करता येऊ शकते. डीआयवाय लर्निंग प्रोग्रॅम्सचा नवा सेट अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना शिकू शकतात आणि डेटा मॅनिप्युलेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन, स्टॅटिस्टिक्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि इतर अनेक विषयातील आपली कौशल्ये वाढवू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना चॅटबॉट्स, इमेज रेकग्निशन मॉडेल्स तसेच व्हॉईस रेकग्निशनवर आधारीत बॉट्स आणि होम ऑटोमेशन सिस्टिम्स विकसित करणे शिकायचे आहे, त्यांच्यासाठी हे लर्निंग प्रोग्राम्स अगदी योग्य आहेत.

परिवर्तनाचा हा प्रवास शालेय स्तरापासून सुरू व्हायला हवा

‘डीकोडएआय’चे सीईओ आणि सहसंस्थापक कार्तिक शर्मा यांनी सांगितले, 2020 मध्ये आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि विकासाच्या एकंदरित प्रक्रियेत अनेक मोठे बदल घडून आले आहेत. आपल्या पंतप्रधानांनी सर्वच क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सर्वत्र केला जाण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिवर्तनाचा हा प्रवास शालेय स्तरापासून सुरु व्हायला हवा आणि ‘डीकोडएआय’मध्ये आम्ही हेच करत आहोत. प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आणि नवनवीन प्रभावी विचार, गोष्टींसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षण प्रक्रिया सहजसोपी बनवण्याची आमची इच्छा आहे. 2022 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत 500 पेक्षा जास्त शाळांपर्यंत पोहोचण्याचे आमचे सध्याचे उद्दिष्ट असून 2022 आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीतआफ्रिका, यूके, यूएसए आणि यूएई यासारख्या देशांमध्ये जागतिक विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना देखील आम्ही आखली आहे. शाळेतील शिक्षकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान देऊन त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी ऑफलाईन टीचर ट्रेनिंग सेशन्स देखील आयोजित केली जातील. यामध्ये डेटा सायन्स, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या विषयांवरील कोर्सेस असतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!