करोनामुळे जगभरात 50 कोटी नोकर्‍यांवर गदा

संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेचे सर्वेक्षण; करोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता, नोकरदारांना बसणार मोठा फटका

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

नवी दिल्ली : करोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक उलाढालींवर मर्यादा आल्यामुळे नोकरदारवर्गाला मोठा फटका बसला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात करोनामुळे जगभरात 50 कोटी लोकांनी नोकरी गमावल्याचे नमूद केले आहे.
नोकरी गमावलेल्या लोकांची ही संख्या अपेक्षेपेक्षा मोठी असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. असे असले, तरी या वर्षाच्या अखेरपर्यंत काही प्रमाणात नोकर्‍या पुन्हा निर्माण होतील, असा आशावाद या सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. कारण आर्थिक उलाढालींना हळूहळू वेग येत असून अनेक कंपन्यांचे व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.
सध्याची स्थिती आश्वासक असली, तरी नजिकच्या काळात करोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता असून तसे झाल्यास नोकरदारांना मोठा फटका बसू शकतो, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेचे अध्यक्ष गाय रायडर यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!