कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या गोवा अध्यक्षपदी अभिजित राणे

आयसीएसआय ही देशातील अग्रेसर संस्था

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) पश्चिम भारत विभागीय मंडळांतर्गत गोवा शाखेच्या अध्यक्षपदी अभिजित राणे यांची निवड झाली आहे.

उपाध्यक्षपदी नरेंद्र शिरोडकर, सचिव म्हणून प्रिया शानभाग, खजिनदार प्रवीण सातार्डेकर, तर सदस्य म्हणून स्वप्नील दीक्षित, दिव्या पै वेर्णेकर, माजी अध्यक्ष अभिजित गावकर अशी समिती निवडण्यात आली आहे. 19 जानेवारी रोजी ही निवड करण्यात आली. नवे अध्यक्ष अभिजित राणे यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपविल्याबद्दल सदस्यांचे आभार मानताना, यापुढेही संस्थेचे कार्य जोमाने सुरू राहील, अशी ग्वाही दिली.

आयसीएसआय ही संस्था संसदेने संमत केलेल्या कंपनी सेक्रेटरी कायदा 1980 खाली स्थापन करण्यात आली होती, ती देशातील अग्रेसर संस्था असून तिचे 60 हजार सदस्य आहेत, तर 3.3 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!