गोव्यात रिलायन्स डिजीटलचा शुभारंभ! या प्रॉडक्ट्सवर मिळणार जबरदस्त सूट

इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर बंपर ऑफर्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : रिलायन्स डिजीटल ही भारताची पहिल्या क्रमांकाची ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची शृंखला असून गोव्यातील अल्टो पोर्वोरिम येथे पहिले दालन लॉन्च करण्यात आले. या नवीन दालनाद्वारे ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध झाली आहे. जिथे त्यांना अनोखा खरेदी अनुभव तर मिळेल, शिवाय सर्वोत्तम विक्री-पश्चात साह्य उपलब्ध होईल. खरेदीचा अनुभव अधिक खास करण्यासाठी रिलायन्स डिजीटलने पहिल्या 100* ग्राहकांकरिता उद्‍घाटनाच्या निमित्ताने आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत.

भरघोस सूट

जे ग्राहक या दालनातून निवडक उत्पादनांची खरेदी करतील त्यांना एअर पॉड्सवर 50% सूट किंवा रु. 999* रुपयांत शार्प 32” (81 सेमी) एलईडी टीव्ही उपलब्ध होईल. त्याशिवाय, टेलिव्हिजनच्या खरेदीवर ग्राहकांना मोफत साऊंडबार जिंकता येईल. सर्व ऑफर्सवर काही अटी आणि नियम लागू आहेत.

याप्रसंगी बोलताना रिलायन्स डिजीटलचे चीफ एक्झिक्यूटीव्ह श्री. ब्रायन बेड म्हणाले की,

आम्हाला गोव्यात पहिल्या दालनाचे उद्‍घाटन करताना अतिशय आनंद होतो आहे. ग्राहकांना आनंददायी खरेदी अनुभव तसेच दोषमुक्त विक्री-पश्चात सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. गोव्यातील आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी करताना मजा येईल ही आशा आम्ही व्यक्त करतो

रिलायन्स डिजीटलद्वारे 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय ब्रँडची 2,000 पेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांच्या विस्तृत उत्पादन श्रेणीचा समावेश आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक Smart Phones, Smart TV, Washing Machines, रेफ्रिजरेटर, Home Theatre, Digital Camera, Laptop, अन्य साहित्य तसेच इतर लहान इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असेल.

“पर्सनलायजिंग टेक्नोलॉजी” हे रिलायन्स डिजीटलचे बोधवाक्य खऱ्या अर्थाने जपण्याचे रिलायन्स डिजीटलचे उद्दिष्ट आहे. ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या पसंतीची तंत्रज्ञान उत्पादने किफायतशीर दरांत उपलब्ध होऊ शकतात. इझी इएमआयसारख्या अनेक वित्तीय साह्य पर्यायांसमवेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धमाल डील्स देण्यात येत आहेत. ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीनुरूप सुयोग्य तंत्र उपलब्ध करून देण्याचे रिलायन्स डिजीटलचे लक्ष्य आहे.

रिलायन्स डिजीटलविषयी

रिलायन्स डिजीटल हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक रिटेलर आहे. रिलायन्स डिजीटल स्टोअर्सचा विस्तार देशातील 800 हून अधिक शहरांमध्ये आणि 400+ लार्ज प्लॅटफॉर्म रिलायन्स डिजीटल स्टोअर्सएवढा आहे. देशाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात 1800+ माय जिओ स्टोअर्स ग्राहकांना सेवा देत आधुनिक तंत्रज्ञान सर्वाना उपलब्ध करून देत आहेत. 200 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँडसोबत 5000 हून अधिक उत्पादने आकर्षक किंमतीत उपलब्ध करून देणारी रिलायन्स डिजीटल मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार, जीवनशैली अनुरूप, साजेशी तंत्रज्ञान विषयक पर्याय पुरवणारी महत्त्वाची सेवा आहे.

रिलायन्स डिजीटलमध्ये प्रत्येक स्टोअर हे प्रशिक्षित आणि माहिती-संपन्न कर्मचारी वर्गाने पूरक आहे. हा कर्मचारी वर्ग स्टोअरमधील प्रत्येक उत्पादनाविषयी सर्व आवश्यक माहिती आनंदाने ग्राहकांना देत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स डिजीटल सर्व उत्पादनांसाठी आफ्टर-सेल्स सर्विस पुरवते. रिलायन्स रेसक्यू, ही विक्रेत्यांची सेवा शाखा आणि भारताचा एकमेव आयएसओ 9001 प्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स सर्विस ब्रँड आहे, हा पूर्ण आठवडाभर साह्य उपलब्ध करून देतो आणि सर्वसमावेशक सेवा पर्याय देऊ करतो.

आता ग्राहकांना सहज-सुलभ खरेदीकरिता कोणत्याही रिलायन्स डिजीटल स्टोअरला भेट देता येईल किंवा www.reliancedigital.in वर लॉग इन करणे शक्य आहे, ज्याद्वारे निरनिराळ्या ठिकाणांवरून वेगवान डिलिव्हरी (तुमच्या नजीकच्या स्टोअरमधून) मिळवता येते. ग्राहक वर्ग वेबसाईटवरूनही खरेदी करू शकतात आणि नजीकच्या स्टोअरला भेट देऊन आपली ऑर्डर ताब्यात घेऊ शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!