Qmin | जिंजर पणजी येथे सुरू…

क्यूमीन सर्वांसाठी 'ग्लोकल' चवीचे जग उघडत आहे

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जिंजर गोवा, पणजी येथेही सुरू झाले आहे. ज्यांना चटकदार जेवणाचा आस्वाद घेत आपल्या मित्र, कुटुंब किंवा अगदी कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत गप्पा टप्पा करायचे आहे, त्यांच्याकरीता ही उत्तम जागा आहे. क्यूमिन हे आयएचसीएलच्या (IHCL) पाककलेचे व्यासपीठ आहे. आता ते जिंजर पणजी येथे सुरू झाले आहे. क्यूमीन सर्वांसाठी ‘ग्लोकल’ चवीचे जग उघडत आहे.

जिंजर ब्रँडच्या लक्स डिझाइनचा विस्तार असणारे क्यूमिन त्याच्या पाहुण्यांना उत्साही, समकालीन आणि अखंड आदरातिथ्य अनुभव देण्याच्या सेवा तत्त्वज्ञानाचा विस्तार करत आहे. नवीन क्यूमिन सर्वोत्कृष्ट आराम, सुविधा आणि शांतता यांचे मिश्रण असेल . या वैशिष्टयांमुळे अतिथींना विविध प्रकारच्या जेवणचाखण्याची संधी देईल.

‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍चांगली सजावट, एक्लेक्टिक वातावरणामुळे क्यूमिन मित्रांसोबत हँगआउट करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. संध्याकाळी जेवणासह बिअर,चिप्स आणि डीप्सचा आस्वाद घेण्यासाठी हे परिपूर्ण ठिकाण आहे. येथे तुम्ही खास बिअर आणि बिंज बास्केटमधून निवड करू शकता . किंवा मिरची चीज टोस्ट, स्पॅगेटी आणि गोव्याच्या आवडत्या ‘पोईसह प्रॉन बालचाओ’ यांच्यासह विविध जागतिक आणि स्थानिक पदार्थ येथे उपलब्ध आहेत. उच्च उर्जा संगीत, स्विंग बेंच आणि आउटडोअर पॅटिओ आणि  विलक्षण सजावट आणि मित्रांसोबत मॅच नाइट्सचा आनंद घेण्यासाठी एक मोठी स्क्रीन क्यूमिनला परिपूर्ण हँगआउट आणि पार्टी स्पॉट बनवते.

जे लोक झटपट जेवणाच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी क्यूमिनचे नवीन ‘ऑन द रन’ काउंटर उत्तम पाककृती पिक-अप आहे. ‘काठी रोल्स’ आणि ‘दही भल्ले’ यांच्यासारख्या लोकप्रिय स्नॅक्ससोबत, पिझ्झा, छोले कुलचे आणि दम बिर्याणी यांसारख्या झटपट जेवण, कुकीज आणि एनर्जी बार सारख्या मंचीज, विविध पेये, मिष्टान्न आणि अगदी बिअरपर्यंत तुम्ही फक्त पौष्टिक जेवण ‘ऑन दि गो’ साठी निवडू शकता.

पाहुण्यांना जेवणासाठी मेन्यूमध्ये गोवन फिश करी आणि भात, ढाबा पनीर , बटर चिकन आणि नान, दाल तडका यासारख्या बऱ्याच पदार्थांचा पर्याय असेल. कुटुंबासोबत  दर्जेदार वेळघालवायचा असो वा बिझनेस मीटिंग असो, क्यूमिनकडे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. मुबलक चार्जिंग पॉइंट्स आणि अखंडीत वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह, ही जागा  प्रवाशांसाठी वैयक्तिक वर्कस्टेशन म्हणून काम करते तर व्हाईब सुरू करा आणि आताच जिंजर गोवा, पणजी येथे क्यूमिनचा आनंद घ्या!

क्यूमिन बद्दल

क्यूमिन हे दक्षिण आशियातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी असलेल्या भारतीय हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) चे गोरमेट पाककला आणि अन्न वितरण व्यासपीठ आहे. ते जून २०२० मध्ये सुरू करण्यात आले. क्यूमिन अॅप त्याच्या स्वयंपाकासंबंधी अनुभवांसह, ग्रुपच्या सिग्नेचर रेस्टॉरंट्समधून डिश वितरीत करते. ही सेवा ३५ हून अधिक हॉटेल्समधील ९० आयएचसीएल रेस्टॉरंट्समधून २० शहरांमध्ये उपलब्ध आहे. बाजाराच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन क्यूमिनने नुकतेच आरामदायी खाद्य पर्यायांची श्रेणी ‘क्यूमिन कम्फर्ट’ सादर केली आहे.  क्यूमिन सबस्क्रिप्शन जेवण सदस्यते नुसार  घरगुती शैलीचे जेवण पुरविते. तसेच सुपरफूड्स – INNERgise (ईनेर्जाइज ) द्वारे तयार केलेल्या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या मेनूचे जेवण पुरविते. याशिवाय या ब्रँडने ‘क्यूमिन सेलिब्रेशन्स’ सारख्या  नवकल्पनांसह व्हर्च्युअल विवाहसोहळा व कॉन्फरन्ससाठी आवडीनुसार मेनू ,जीवनशैली गॉरमेट स्टोअर्स व आऊटलेट्स आणि फूड ट्रक्ससह आपली व्याप्ती वाढवली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!