अॅक्सिस बँकेने आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत ४,१२५ कोटी रुपयांचा नोंदवला नफा…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँकेने आज आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल आज जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २,१६० कोटी रुपये होता जो आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत वाढून ४,१२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बँकेला व्याजातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नामधे (एनआयआयआय) आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत साल दर साल तुलनेत २१% आणि तिमाहीच्या तुलनेत ६% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२च्या पहिल्या तिमाहीत ते ७,७६० कोटी रुपये होते व आता आर्थिक वर्ष २०२३च्या पहिल्या तिमाहीत ते ९,३८४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत अॅक्सिस बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) वार्षिक आधारावर १४ बीपीएस आणि तिमाहीच्या तुलनेत ११ बीपीएस वाढून ३.६०% झाले आहे. सीएएसएमध्ये साल दर साल आधारे १६% आणि तिमाहीच्या तुलनेत १% वाढ झाली आहे तर सीएएसए रेशो वार्षिक आधारे ५३ बीपीएसने वाढून ४३% झाला आहे. बँकेच्या संचालनात्मक महसुलात ११% ची वाढ दिसून आली आहे, हा महसूल आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ११,११९ कोटी रुपयांवरून २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १२,३८३ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. ३० जून २०२२ रोजी बँकेचे एकूण एनपीए आणि निव्वळ एनपीए पातळी अनुक्रमे २.७६% आणि ०.६४% वर पोहोचले, जे ३० जून २०२१ रोजी ३.८५% आणि १.२०% होते. बँकेचे शुल्क उत्पन्न साल दर साल आधारे ३४% नी वाढून ३,५७६ कोटी रुपयांवर पोहोचले. रिटेल शुल्क साल दर साल आधारे ४३% वाढले आणि एकूण शुल्कामध्ये याचे योगदान ६६% होते. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत नफ्यासहित एकंदरीत भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीएआर) १७.८३% आणि सीईटी१ रेशो १५.१६% नोंदवला गेला आहे.