चेक बाऊन्स होणं हा एक गुन्हा

चेक बाऊन्स झाल्यास होऊ शकतो दोन वर्षांचा तुरुंगवास

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: चेक बाऊन्स ही बँकिंगमधील नकारात्मक परिस्थिती मानली जाते. कधीकधी असं घडतं की जेव्हा बँकेत पैसे भरण्यासाठी चेक दिला जातो, तेव्हा तो नाकारला जातो. बॅंक पैसे क्रेडिट न करता हा चेक परत पाठवते. या परिस्थितीला चेक बाऊन्स असे म्हणतात. जो चेक देतो व त्यावर स्वाक्षरी करतो त्याला ड्रॉवर म्हणतात. ज्या व्यक्तीने चेक प्राप्त केला आणि पैसे भरण्यासाठी तो बँकेत जमा केला त्याला पेई म्हणतात.

हेही वाचाः भोम मोपा येथे चंद्रकांत बांदेकर यांचा खून

चेक बाऊन्स होणं हा एक गुन्हा

चेक बाऊन्स होण्याला एक प्रकारचा गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी शिक्षा म्हणून आपल्याकडून काही दंडाची रक्कम वसूल केली जाते. चेक बाऊन्स झाल्यास आपणास आपले पैसे मिळणार नाहीत. तसंच दंड म्हणून आकारली जाणारी रक्कम आपल्या खात्यातूनच वजा केली जाते. जर कोणी आपल्याला चेकद्वारे पैसे दिले आणि आपण तो चेक बँकेत जमा करण्यापूर्वी त्या व्यक्तीशी एकदा खात्यात पुरेसे पैसे आहेत का, याची खात्री करून घ्या. जर तो चेक बाउन्स झाला तर आपल्याला त्या व्यक्तीस चेक बाऊन्सबद्दल माहिती द्यावी लागेल.

हेही वाचाः करोना बळींच्या कुटुंबाला आधार; आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यास अर्थसाह्य

तुम्हाला त्या व्यक्तीने 1 महिन्याच्या आत पैसे देणं बंधनकारक असतं. जर त्या व्यक्तीने तुम्हाला वेळेवर पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्याला कायदेशीर नोटीसही पाठवू शकता. जर त्याने त्या कालावधीतही पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करू शकता. तुम्ही त्याच्याविरूद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा, 1881 च्या कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल करू शकता. तुम्हाला त्या व्यक्तीने वेळेवर देय रक्कम परत न केल्यास तुमचा खटला फौजदारी तक्रार म्हणून नोंदविला जाईल.

हा व्हिडिओ पहाः NETWORK ISSUE | मोबाईल नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा

कलम 138 कधी वापरला जातो

कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा थकित रक्कम वसूल न झाल्यास तसेच दोन पक्ष आणि चेक बाऊन्समधील व्यवहारानंतर देय रक्कम न मिळाल्यास कलम 138 अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कर्जाची मुदत संपल्यानंतर दिलेला चेक बाऊन्स झाल्यास त्या व्यक्तीविरूद्ध कलम 138 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला चेक देणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षं तुरुंगवास तसंच व्याजासह दुप्पट रक्कम द्यावी लागू शकते. लक्षात ठेवा की तुम्ही राहत असलेल्या परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.

हा व्हिडिओ पहाः CCP LABOUR | 21 कामगारांना पुन्हा सेवेत घ्या!

3 महिन्यांत चेक वटवून घ्या

चेक मिळाल्यानंतर तो तीन महिन्यांच्या आत तुमच्या खात्यात जमा करा. 3 महिन्यांनंतर कुठल्याही चेकची वैधता संपते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं असेल तर ते परत करण्यासाठी चेक वापरा. कोणत्याही संस्थेला देणगी देण्यासाठी केवळ चेकचा वापर करा. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तुम्ही पुढील तारखेचा चेक जमा करू शकता.

हेही वाचाः …आता 50 किलोच्या पोत्यातून होणार ‘सरकारी वाळू विक्री’ !

बँक चेक बाऊन्स होण्याची कारणं

जेव्हा चेक बाऊन्स होतो, तेव्हा आपल्याला बँकेकडून एक पावती दिली जाते. ज्यामध्ये चेक बाऊन्स होण्याचं कारण नमूद केलेलं असतं. जर तुमचा कोणताही चेक बाऊन्स झाला असेल तर तुम्ही कर्जदाराला 30 दिवसांच्या आत नोटीस पाठवायला हवी. नोटीस पाठवूनही कर्जदाराकडून 15 दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करू शकता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!