तातडीनं आटपून घ्या बँकेची कामं! नोव्हेंबरचा अर्धा महिना बँका बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण येणार आहेत. दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असेल. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, संपूर्ण देशात बँकांना 15 दिवसांची सुट्टी असेल.
ही सुट्टी राजपत्रित, रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि स्थानिक सुटींमुळे असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, असेही होऊ शकते की, एखाद्या राज्यात बँका बंद असतील आणि त्याचवेळी इतरत्र उघडया असू शकतात.
या सेवा राहतील उपलब्ध
आपण सुट्टीच्या दिवसांतही मोबाइल बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय आणि एटीएमद्वारे बँकिंग व्यवहार करू शकता. या सेवांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. तथापि, चेक क्लिअरिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कशा आहेत सुट्ट्या?
5 रविवार
13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत दिवाळी
30 तारखेला गुरुनानक जयंती
28 तारखेला चौथा शनिवार
हेही वाचा –
म्हापसा अर्बन बँकेसंदर्भातली महत्त्वाची बातमी
हीच खरी पॉझिटिव्ह बातमी! अहो, पगारवाढ मिळतेय, आपली कधी?
प्रतीक्षा संपली! इथे पाहा पुनवेचं खास गाणं, जे साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी