करोनाच्या महामारीत टोयोटाची नवी कार लॉन्च, कशी आहे अर्बन क्रूजर?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पणजी : एसयूवी सेगमेंटमध्ये लौकीक वाढवण्यासाठी तसेच तरुण ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी, टोयोटा किर्लोस्कर मोटरने त्यांची नवीनतम टोयोटा अर्बन क्रुजर सादर केली आहे. टोयोटा अर्बन क्रूजर ही टोयोटा ग्लान्झा या प्रीमियम हॅचबॅकच्या भरघोस यशानंतर जागतिक टोयोटा-सुझुकी युतीच्या अंतर्गत भारतात लाँच केले जाणारे दुसरे मॉडेल आहे.
नवीन अर्बन क्रुजर आजच्या यशस्वी तरुणांसाठी जे आकांक्षी आहेत आणि रिस्पेक्टस्टँड्सटॉल या संकल्पनेवर विश्वास करतात, अशा तरुण पिढीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट एसयूवी एका कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान सादर करण्यात आली. यावेळी टीकेएमचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाजू योशिमुरा, नवीन सोनी, सीनियर वाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड सर्विस आणि तदाशी असाजुमा, व्हाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड मार्केटिंग हे देखील उपस्थित होते. यावेळी यूथ आयकॉन आयुष्मान खुराना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये भाग घेतला.
काय आहेत वैशिष्ट्य?
- इंजिन – के सीरिज1.5 लीटरचं फोर सीलिंडर इंजिन.
- गिअर बॉक्स – मॅन्युअल ट्रान्समिशन/ ऑटोमॅटिक
- एव्हरेज – 17.03 प्रति लीटर (मॅन्युअल)/ 18.79 प्रति लीटर (ऑटोमॅटिक)
कॉम्पॅक्ट एसयूवी क्षेत्रात आमचा प्रवेश अशा वेळी झाला आहे, जेव्हा अँडव्हान्स बॉडी स्ट्रक्चर आणि रोडवर उत्कृष्ट उपस्थितीमुळे आम्हाला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. आम्ही टोयोटा कुटुंबात नवीन ग्राहकांचे, विशेषत: तरूणांचे स्वागत करतो.
– टीकेएमचे व्यवस्थापकीय, संचालक मसाकाजू योशिमुरा