AUTO VARTA | आयफोन नंतर आता टेस्लादेखील भारतात तयार होणार, वाचा सविस्तर

ऋषभ | प्रतिनिधी
वेबडेस्क 13 जुलै | इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लाने भारतात त्यांचा पहिला कार कारखाना सुरू करण्यासाठी भारताच्या वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे. भारत सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात वार्षिक 500,000 इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची क्षमता असलेला कारखाना उभारण्याची चर्चा आहे. तर इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती 25 लाख रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

टेस्ला भारताकडे निर्यात केंद्र म्हणूनही पाहत आहे कारण ते त्यांची वाहने भारतात तयार करण्याचा आणि नंतर इंडो-पॅसिफिक प्रदेशातील इतर देशांना वाहने निर्यात करण्याचा विचार करत आहेत.
“टेस्ला आमच्याकडे एक महत्त्वाकांक्षी योजना घेऊन आली आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळी सर्व वाटाघाटी सकारात्मक मार्गाने होतील , विशेषत: त्यात स्थानिक उत्पादन आणि निर्यात या दोन्हींचा समावेश आहे,” असे या सगळ्या घडामोडींचे जवळून निरीक्षण करणाऱ्या सूत्राने सांगितले आहे.
चीनमध्ये मेगा फक्टरी असल्यानंतरही टेस्लाच्या भारताचा नवा कारखाना तयार करण्याचा विचार करण्याचा विचार करण्याच्या हालचाली इतर अनेक कंपन्यांच्या अनुषंगाने आहेत ज्यांनी पंतप्रधान मोदीच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा एक भाग म्हणून भारतात कारखाने सुरू केले आहेत जेथे अनेक देशी विदेशी कंपन्यांना संधी दिली आहे.

गेल्या महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अब्जाधीश आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना यूएस दौऱ्यादरम्यान भेटले तेव्हा त्यांना भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते.

बैठकीनंतर, इलॉन मस्क यांनी प्रेसशी चर्चा करताना सांगितले की, “त्यांना (पंतप्रधान मोदी ) खरोखर भारताची काळजी आहे कारण ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास आग्रह करत आहेत, जे आम्ही करू इच्छितो. आम्ही फक्त योग्य वेळ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत … मला विश्वास आहे की टेस्ला भारतात येत्या काळात वाहन उद्योग क्षेत्रात नवीन क्रांति करेल यात शंकाच नाही ”
टेस्लाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताला भेट देऊन मे महिन्यात भारतीय नोकरशहा आणि मंत्र्यांशी भारतात कार आणि बॅटरीसाठी उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती.
.