AUTO & MOTO VARTA : Yulu आणि Bajaj Autoच्या संयुक्त विद्यमाने Miracle GR आणि DeX GR इलेक्ट्रिक बाइक्स विक्रीस उपलब्ध, पहा सविस्तर पॉवरट्रेन

Yulu Miracle GR आणि Yulu DeX GR हब-माउंट मोटरसह येतात. यात एलईडी हेडलाइट, एलईडी टेल-लॅम्प आणि सेंटर स्टँड आहे. कंपनीने DeX GR ई-बाईकमध्ये लगेज कॅरिअर दिले आहे, जे 15 किलोपर्यंत वाहून नेऊ शकते.

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोवन वार्ता लाईव्ह वेब डेस्क :

ठळक मुद्दे

  1. Yulu Miracle GR आणि DX GR इलेक्ट्रिक बाइक्स भारतात फेब्रुवारी महिन्यात लॉन्च झाल्या आहेत तर मे महिन्यापासून थेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
  2. इलेक्ट्रिक बाइकचा कमाल वेग ताशी २५ किमी आहे
  3. या इलेक्ट्रिक बाईकसाठी परवान्याची गरज भासणार नाही
Yulu और Bajaj Auto ने लॉन्च किए Miracle GR व DeX GR इलेक्ट्रिक बाइक, नहीं  पड़ेगी लाइसेंस की जरूरत - Mysmartprice Hindi

EV मोबिलिटी टेक कंपनी Yulu ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केल्या आहेत. कंपनीने Miracle GR आणि Dex GR सादर केले आहेत.  दोन्ही बाइक मोडूल्स चेतक टेक्नॉलॉजीज लिमिटेडने विकसित केले आहेत, जी ईव्ही सेगमेंटमध्ये बजाजची उपकंपनी आहे. नवीन मिरॅकल GR आणि DeX इलेक्ट्रिक बाइक्स प्लॅटफॉर्म शेअर करतात. नवीन युलू ई-बाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक एबझोऱबर्स आहेत. नवीन बाइक्सना दोन्ही ड्रम ब्रेक मिळतात. नवीन Yulu e-bikes 25KM प्रति तास या इलेक्ट्रॉनिकली मर्यादित टॉप स्पीडसह येतात.

Miracle GR - Yulu

Yulu Miracle GR आणि Yulu DeX GR ची वैशिष्ट्ये

Yulu Miracle GR आणि Yulu DeX GR हब-माउंट मोटरसह येतात. यात एलईडी हेडलाइट, एलईडी टेल-लॅम्प आणि सेंटर स्टँड आहे. कंपनीने DeX GR ई-बाईकमध्ये लगेज कॅरिअर दिले आहे, जे 15 किलोपर्यंत वाहून नेऊ शकते. Yulu ने आधीच DeX GR ई-बाईक रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. जिथे जिथे कंपनीची उपस्थिती असेल तिथे ते रस्त्यावर दिसू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही नवीन थर्ड जनरेशन ई-बाईक फुल प्रूफ, फॉल प्रूफ आहे आणि ओटीए सपोर्टसह येईल. मिरॅकल जीआर आणि डीएक्स जीआर दोन्ही स्मार्ट डॉकलेस ईव्ही तंत्रज्ञानासह येतात.

स्वेपेबल बॅटरी

युलूने बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कसाठी मॅग्नासोबत भागीदारी केली आहे. युलू आणि मॅग्ना यांनी युमा एनर्जी लाँच करण्यासाठी एक संयुक्त उपक्रम तयार केला आहे, जी इलेक्ट्रिक दुचाकींसाठी ‘बॅटरी-एज-ए-सर्विस’ प्रदान करते. मॅग्नाने सप्टेंबर 2022 मध्ये हा संयुक्त उपक्रम सुरू करण्यासाठी $77 दशलक्ष गुंतवणूक केली होती तर ही सेवा 2 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू ऑलरेडी झालेली आहे. त्याची बेंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्ये जवळपास 100 स्टेशन्स आहेत. 2024 पर्यंत ही स्टेशन्स 500 पर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

Home - Yulu

ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही

सदर बाईक ट्रेस करण्यासाठी Yulu अॅपचा वापर केला जाऊ शकतो. चांगली गोष्ट म्हणजे ही नॉन-मोटाराइज्ड बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही. सदर वाहन हे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी वापरले जाऊ शकते. ऑक्टोबर 2023 पर्यंत सुमारे 1 लाख इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

12 Best Places For A Yulu Bike Ride In Delhi | So Delhi
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!