AUTO & MOTO VARTA : ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम रेंज देणाऱ्या 11 इलेक्ट्रिक स्कूटर – Ola S1 Pro ते Hero Vida V1 Plus, वाचा सविस्तर विश्लेषण

ऋषभ | प्रतिनिधी
ठळक मुद्दे
- टॉप 11 ट्राइड अँड ट्रस्टेड इ-बाइक्सचे पर्याय जे 181km पर्यन्तची रेंज देतात
- यांच्या किंमती 1 लाख रुपयांपासून सुरू होतात
- सदर मॉडेल्स ओला, हीरो मोटोकॉर्प, हीरो इलेक्ट्रिक, टीव्हीएस या प्रथितयश EV कंपन्यांची आहेत

भारतात इलेक्ट्रिक वाहनाच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे तिच्या मायलेजची चिंता आणि कितीही झाले तरी पेट्रोल वाहनाची सर इलेक्ट्रिक वाहनाला नाहीच हे कुणीही मान्य करेल. पण या समस्येचे हळूहळू निवारण होत आहे. गेल्या 2-3 वर्षात अशा अनेक बाइक्स आल्या आहेत ज्या मायलेजच्या बाबतीत खूपच उजव्या ठरतात, आता खाली आपण अशाच ट्राइड अँड ट्रस्टेड 11 इ-बाइक्सची तोंड ओळख करून घेणार आहोत ज्या तुम्हाला उत्तम स्टाइल कम्फर्ट संहित उत्तम मायलेज देखील देतात. सादर यादीत ज्या बाइक्स आधीच जनमानसात लोकप्रिय आहेत अशाच बाइक्स ना सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे.
नाव | रेंज | सर्वोच्च वेग | किंमत (एक्स-शोरूम दिल्ली ) |
Ola S1 Pro | 181 | 116 | 129999 |
Hero Vida V1 Plus | 165 | 82 | 139000 |
हिरो इलेक्ट्रिक NYX | 165 | 42 | 84000* |
ग्रॅव्हटन क्वांटा | 150* | N/A | 115000* |
Ather 450X Gen 3 | 146 | 80 | 139005 |
TVS iQUBE ST | 145 | 80 | 130000* |
Hero Vida V1 Pro | 143 | 80 | 128000 |
ओला S1 | 141 | 95 | 99999 |
हिरो ऑप्टिमा सीएक्स | 140 | 45 | 82000* |
Ather 450 Plus | 108 | 80 | 117495 |
ओला एस1 एअर | 101 | 85 | 84999 |
Ola S1 Pro – 181 किमी
181km च्या प्रमाणित श्रेणीसह, S1 Pro हा गेम मोठ्या फरकाने जिंकतो. अनेक वापरकर्त्यांनी यापूर्वी २०० किमीची श्रेणी देखील नोंदवली आहे. S1 pro पुढे भारतातील कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्वाधिक टॉप स्पीडसह – 116 किमी/ता. सुरुवातीच्या अनेक स्कूटर्सना यांत्रिक आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही त्रुटींचा सामना करावा लागला, तर नवीन मॉडेल्स खूप चांगले आहेत. यामध्ये नवीन OS 3.0 अपडेटचा समावेश आहे.

Hero MotoCorp Vida V1 Plus – 165km
हीरो मोटोकॉर्पची ही पहिली वहिली इ-बाइक तब्बल 165km ची रेंज देण्यास सक्षम आहे आणि यामुळेच टी सदर यादीतील दुसरी सर्वात जास्त मायलेज देणारी बाइक ठरते. हटके लुक्स आणि जबरदस्त अशी इतर वैशिष्ट्ये या बाईकला किंचित महाग जरूर बनविते पण त्यातल्या त्यात ही तुमच्यासाठी बेस्ट चॉइस ठरते.

HERO ELECTRIC NYX HX – 165 किमी
Hero Electric आणि Hero MotoCorp मध्ये काहीही साम्य नाही ही गोष्ट पहिल्यांदा समझून घेणे महत्वाचे ठरेल . Hero electric अनेक वर्षांपासून ई-स्कूटर्स विकत आहे आणि त्याचेच रग्ड NYX हे मॉडेल 165km रेंज ऑफर करते. सदर मॉडेल ड्युल बेटरीसमवेत येते, आणि जरी NYX HX चा ताशी वेग फक्त 42/किमी प्रतितास असला तरी डेलिव्हरी एक्सीक्युटीव/ वेंडर साठी हा एक दमदार पर्याय ठरतो.

ग्रॅव्हटन क्वांटा- 160 km
सध्यपरिस्थितीत मॉडेलसाठीची स्टॅंडर्ड रेंज अजून प्रमाणित केलेली नाहीये , परंतु कंपनीच्या वेबसाइटवर दावा केला आहे की इको मोडमध्ये 160 किमी. चालू शकते . Quanta ची किंमत संरचना देखील वेबसाइटवर स्पष्ट नाही. येणाऱ्या काळात ते लॉंच केले जाईल तेव्हा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. हे एक अतिशय आश्वासक ई-मॉडेल म्हणून समोर येते आहे .

Ather 450X Gen 3 – 146km
सध्यस्थितीला ATHER 450X GEN 3 ही सर्वात लोकप्रिय इ-बाइक आहे. सदर 3 RD GEN एडवांस्ड मॉडेल 146 km ची रेंज देते, तसेच 80/km/hr ची टॉप स्पीड ही बाइक देते. जबरदस्त लूक्स, मस्त चार्जिंग ऑप्शन आणि इतर वैशिष्ट्ये तुमच्या गरजां पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.

TVS iQube ST – 145km
सादर आहे TVSची iQube ST जी 145 km ची रेंज देते. तूर्तास याची बूकिंग बंद झाली असून डिलिव्हरी सुरू आहे. स्टाइल स्टेटमेंट आणि ओवर ऑल परफॉर्मेंस पाहता स्टूडेंट्स आणि गृहिणींकरिता ही एक चांगला पर्याय ठरू शकते. किंमत अंदाजे 115000 रु. पासून सुरू

Hero Motocorp Vida V1 Pro – 143km
Vida ची ही कमी किंमतीची प्रो आवृत्ती 143km ची अतिशय चांगली मायलेज देते. Vida प्लसच्या तुलनेत यात लहान बॅटरी पॅक आहे आणि त्यामुळे कमी रेंज डिलिव्हरी आहे असे म्हणता येईल. किंमत 1.28 लाखांपासून पुढे. मुख्य म्हणजे हयात स्वायपेबल बॅटरी आहे.

Ola S1 – 141 किमी
OLA S1 PRO नंतर पुनः OLA चीच S1 तुमच्या समोर सादर आहे. कॉम्पॅक्ट लूक्स तरीही आरामदारी रायडर एबिलिटीमुळे अनेक तरुणांची ही पहिली पासनाती आहे. किंमत 1 लाखांपासून सुरू. तसेच यातही OLA S1 PRO च्या तुलनेत छोटा बॅटरी पॅक आहे. पण 141 किमी रेंज देखील तेवढीच दमदार आहे

Hero Optima CX (ER) – 140km
हिरो इलेक्ट्रिकची HERO OPTIMA CX (ER) हा देखील एक चांगला पर्याय आहे. किंमत 88000 रु पासून सुरू हॉट असून यातली एक खूप चांगली गोष्ट म्हणजे या प्राइस रेंज मध्ये देखील CX मध्ये स्वापेबल बॅटरी पॅक आहे. सदर बाइक भारतातील सर्वात जुन्या ई-स्कूटरपैकी एक आहे आणि ती ४५ किमी/ताशी या सर्वोच्च गतीसह येते. मायलेजही 140 km आहे. बजेट जर कमी असेल तर याचा विचार जरूर करावा.

एथर 450 प्लस – 108 किमी
450X Gen 3 तुमच्यासाठी खूप महाग असल्यास, 21k ने स्वस्त असलेले हे प्लस मॉडेल पहा. 108 km जरी कमी रेंज वाटत असली तरी बजाजच्या चेतक पेक्षा तरी जास्तच आहे. ही बाइक स्टाईलीश आणि खूप आरंदायी आहे. टॉप स्पीड 80 km/hr पर्यंत तुम्ही दामटवू शकता.

ओला एस1 एअर – 101 किमी
ओला ई-स्कूटरने रु 84999 मध्ये, सादर केलेले हे एअर मॉडेल पहाच. ही उत्कृष्ट वॅल्यू फॉर मनी बाइक असून एका चार्जवर 100km पेक्षा जास्त मायलेज देते . Ola ने कमी किंमत ध्यानी ठेऊन बाईकचा आकार ही छोटाच ठेवला आहे आणि तरीही तुम्हाला 85km/h चा उच्च वेग मिळतो.

टीप : तर या येथे तुमच्या समोर आम्ही सध्यस्थीतीत सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या रेंज ओरीयंटेड आणि बजेट ओरीयंटेड अशा टॉप 11 इलेक्ट्रिक बाइक्स सादर केल्या आहेत. ev सेगमेन्ट मध्ये अनेक गाड्या लॉंच हॉट असतात पण सगळ्याच काही ट्राइड अँड ट्रस्टेड नाहीत. येणाऱ्या काळात अनेक EV मॉडेल्स कव्हर करू. तसेच सादर केलेली यादी ही फक्त तुमच्या रेफरन्ससाठी आहे. कृपया खरेदी करताना अनुभवी सल्लागारांचा सल्ला जरूर घ्यावा.