एवढ्या किमतीत करू शकता ऑडी Q2 चं बुकिंग!

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई: ऑडी या जर्मन वाहन निर्मिती कंपनीनं भारतात ऑडी Q2 गाडीच्या बुकिंगला सुरूवात केलीय. अॅडव्हेंचर असो वा मोठ्या शहरातील दैनंदिन आयुष्य, ऑडी क्यू 2 एक ऑल राऊंडर आहे. तरुण, विकासात्मक भारतीय खरेदीदाराचं स्वप्न पूर्ण करण्याची यात क्षमता आहे. केवळ रू. 2 लाखांची रक्कम भरून तुम्ही ऑडी क्यू२ चं बुकिंग करू शकता.
ठळक मुद्दे
- • Q2 हा ऑडीचा वर्षातील पाचवा प्रॉडक्ट लाँच.
- • मोठ्या प्रमाणात भर पडत असलेल्या विकासात्मक भारतीय ग्राहकांना ऑडी क्यू२ सेवा देणार.
- • वैशिष्ट्यांनी समृद्ध – कनेक्टिव्हिटी, इंफोंटेनमेंट आणि असिस्टंस प्रणालींचा समावेश.
- • 6.5 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तासांचा वेग, 2.0 लीटर टीएफएसआय क्वाट्रोच्या ताकदीसह ही लक्झरी ऑल–राऊंडर चालवायला मजा येते.
- • सर्व ऑडी इंडिया डीलरशिप्समध्ये आणि अधिकृत कंपनी वेबसाईट www.audi.in वर बुकिंग केलं जाऊ शकतं.
- • इंट्रोडक्टरी ‘पीस ऑफ माईंड’ फायदा: 5 वर्षांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्विस पॅकेज, 2+3 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी आणि 2+3 वर्षांची रोड साईड असिस्टंस बुकिंगसोबत कॉम्प्लिमेंटरी.
- • सुरूवातीची बुकिंग किंमत – रू.2 लाख
ऑडी Q2 साठी बुकिंग सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही वर्षातील आमची पाचवी सुरूवात असून ऑडी Q2 भारतासाठी अतिशय महत्त्वाचे उत्पादन आहे. ते ब्रॅन्डसाठी खरेदीदारांचा एक नवीन वर्ग खुला करतं. ही एक लक्झरी ऑलराऊंडर असून यात अनेक वैशिष्ट्यं आहेत. गाडीमध्ये परफॉर्मन्स आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सचा दैनंदिन वापरासाठीच्या व्यावहारिकतेचा उत्तम मिलाफ आहे. मला खात्री आहे की ज्या तरुण ग्राहकांना लवकरात लवकर ऑडी परिवाराचा हिस्सा बनायचे आहे ते ह्या गाडीचा परफॉर्मन्स पाहून थक्क होतील.
बलबिर सिंग धिल्लॉन, ऑडी इंडियाचे प्रमुख
ग्राहक आपल्या घरात बसून ऑनलाईन www.audi.in वर ऑडी Q2 चं बुकिंग करू शकतात किंवा आपल्या नजीकच्या ऑडी इंडिया डीलरशिपमध्ये खरेदीमध्ये आपली रूचि असल्याचे नोंदवू शकतात.