एम्क्युअर फार्माने बळकट केले आपले संचालक मंडळ

सुविख्यात पार्श्वभूमीच्या स्वतंत्र संचालकांची नेमणूक केली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुणेः भारतातील आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एम्क्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेडने सुविख्यात पार्श्वभूमीच्या स्वतंत्र संचालकांची नेमणूक करून आपले नेतृत्व आणखी बळकट केले. नुकतीच कंपनीने आपल्या मंडळात वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञानसंपन्न आणि अनुभवसंपन्न अशा चार स्वतंत्र संचालकांची भर घातली.

हेही वाचाः सोनू यादव मृत्यूप्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी

नव्याने संचालक मंडळामध्ये आलेल्या डॉ. शैलेश आय्यंगर, विजय गोखले, हितेश जैन आणि डॉ. विद्या येरवडेकर यांचा समावेश आहे. यावर्षाच्या सुरुवातीला बर्जीस देसाई यांनी एम्क्युअर मंडळाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारला होता. १९९७ पासून आपल्या स्वतंत्र संचालकांमधून अध्यक्ष निवडण्याची कंपनीची प्रदीर्घ परंपरा आहे.

हेही वाचाः किर्लोस्कर बंधूतही भाऊबंदकीचा वाद

जगभरातील ७० हून अधिक देशांत जागतिक पोहोच असलेल्या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या औषधनिर्माण कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एम्क्युअरचे आपले सामर्थ्य आणखी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. एम्क्युअर फार्मास्युटीकल्ससाठी नेतृत्वाच्या पातळीवर ही आणखी भर पडल्यामुळे त्यातून त्यांची अनुभव समृद्धता आणि कामकाज आणखी बळकट करण्याकडे असलेली बांधिलकी दिसून येते. कायदा, औषधनिर्माण क्षेत्र, योजना विकास आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील या नवीन सदस्यांच्या एकत्रित सामर्थ्यातून एम्क्युअरच्या विकासाच्या मार्गात आणखी मुसंडी मारता येईल.

हेही वाचाः ऐकावं ते नवलंच! बदली रद्द करण्यासाठी दिलं ‘हे’ कारण

नवीन अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालक मंडळ सदस्यांविषयी:

एम्क्युअरचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक बर्जीस देसाई हे एम्क्युअर फार्मास्युटीकल्सशी तीन दशकांहून अधिक काळ संबंधित आहेत. व्यवहार आणि वादविवाद निराकरण कायदा या क्षेत्रात गेली ३७ वर्षे ते कार्यरत असलेले देसाई जेएसए या राष्ट्रीय पातळीवरच्या लॉ फर्म मधून व्यवस्थापकीय भागीदार म्हणून निवृत्त झाले. केंब्रिज विद्यापीठातून मास्टर ऑफ लॉ (प्रथम तारांकित) केलेले देसाई आता प्रायव्हेट क्लायंट प्रॅक्टिस मध्ये स्वतंत्र लीगल कौन्सिल म्हणून कार्यरत आहेत. माजी पत्रकार देसाई अर्धवेळ लेखक आणि स्तंभलेखक म्हणूनही काम करतात.

हेही वाचाः गोव्यातील पोलीस आणि अधिकारी मॅनेज होऊ शकतील

अतिरिक्त संचालक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या डॉ. शैलेश आय्यंगर यांना आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रातला ३४ वर्षांचा व्यापक अनुभव आहे. डॉ. आय्यंगर यांनी सनोफी मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले असून आंतरराष्ट्रीय नेतृत्व संघाचे सदस्य आणि भारत आणि दक्षिण आशिया अध्यासनाचे अध्यक्ष होते. जवळपास १८ वर्षे सनोफी समूहाचा सर्व व्यावसायिक कारभार त्यांनी सांभाळला. त्यामध्ये औषधनिर्माण, विशेष आरोग्यसेवा, लस, प्राण्यांचे आरोग्य आणि ग्राहक आरोग्यसेवा सुविधा या सगळ्या विभागांचा समावेश होता. २००२मध्ये सनोफीमध्ये सहभागी होण्याआधी डॉ. आय्यंगर १४ वर्षे स्मिथकेलाईन बेकॅम फार्मास्युटीकल्स आणि भारत आणि ग्रेट ब्रिटन मध्ये जीएसके येथे कार्यरत होते. आरोग्यक्षेत्राच्या संदर्भात डॉ. आय्यंगर नाविन्यपूर्ण भागीदारी उभारून जसे की देशातील आणि विभागातील सर्वाधिक मोठ्या विद्यासनांपैकी एक असलेले अपोलो शुगर क्लिनिक्स बरोबरची भागीदारी यांच्या जोडीला जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर M&A कामे (एकत्रीकरण आणि अधिग्रहण) एकत्र करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण काम करत होते.

हेही वाचाः कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार; 40 लोकांवर होणार ट्रायल

स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झालेले विजय गोखले १९८१ पासून भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत होते. गोखले यांच्या राजनैतिक कामगिऱ्यांमध्ये हाँगकाँग, हनोई, बिजींग आणि न्यूयॉर्क येथील कार्यकालाचा समावेश आहे. परराष्ट्र खात्याच्या मुख्यालयात काम करताना उपसचिव (अर्थखाते), संचालक (चीन आणि पूर्व आशिया) आणि सहसचिव (पूर्व आशिया) म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांचा भू-राजकीय दृष्टीकोन एम्क्युअरच्या भविष्यातील धोरणांना नवा आयाम देतील.

हेही वाचाः सासष्टीतही कागदपत्रांत बेकायदा फेरफार करून जमिनी हडप

स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झालेले हितेश जैन हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे १९९६ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी आहेत. परिणम लॉ असोसिएट्स मध्ये ते व्यवस्थापकीय भागीदार आहेत. विविध विभागातले सर्व प्रकारचे दावे आणि अशील यांचा २४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी आपल्या अशिलांसाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात, देशातल्या वेगवेगळ्या हायकोर्टात, जिल्हा न्यायालयात (दिवाणी, फौजदारी अशा विविध प्रकारातले), ग्राहक मच, स्पर्धा आयोग आणि TDSAT अशा वेगवेगळ्या ठिकाणी दावे लढले आहेत. आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट व्यावसायिक व्यवहार, बँकिंग आणि कामगार कायदे आणि जोडीला एकत्रीकरण आणि अधिग्रहण अशा वेगवेगळ्या प्रश्नांबाबत ते आपल्या अशिलांना सल्ला देतात. प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेत इश्यू आणि सिक्युरिटी व्यवहारासाठी ते कंपन्यांनाही सल्ला देतात.

हेही वाचाः गोवा दिवाळखोरीच्या दिशेने चाललायः सुदीन ढवळीकर

स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झालेल्या डॉ. विद्या येरवडेकर सिंबायोसिस सोसायटीच्या प्रमुख संचालक आहेत आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या कुलपती आहेत. त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कार आणि मानसन्मानांमध्ये उच्च शिक्षणासंदर्भातील एफआयसीसीआय समितीचे अध्यक्षपद, केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने उभारलेल्या इंडिया ब्रँड इक्विटी फांऊडेशनचे सदस्यपद, केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने उभारलेल्या सेन्ट्रल गव्हर्निंग कौन्सिल ऑफ सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे सदस्य पद यांचा समावेश आहे. डॉ. येरवडेकर यांनी वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी, कायदा अभ्यासक्रमात पदवी आणि ‘इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया’ या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!