जिओचं न्यू इअर गिफ्ट! जिओवरुन कुणालाही फुकट कॉल करता येणार

पुन्हा एकदा जिओ केली जबदस्त घोषणा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना न्यूइयरच्या पूर्वसंध्येला मोठी खूशखबर दिली आहे. जिओने कॉलिंग पूर्णपणे मोफत केलंय. त्यामुळे आता जिओवरुन कोणत्याही नंबरवर फोन केला तर पैसे मोजावे लागणार नाहीत. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नववर्षाचं जबरदस्त गिफ्ट दिलंय. हे जबरदस्त गिफ्ट 1 जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी लागू असेल. त्यामुळे पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य करण्याची घोषणा जिओ कडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – एकच नंबर! वयाच्या अवघ्या 21 वर्षी बनणार महापौर

जिओने आययूसी म्हणजेच इंटरकनेक्ट यूजर्स चार्चेस पूर्णपणे बंद केलेत. जिओ ग्राहकांना आता 1 जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येईल. देशात १ जानेवारी २०२१ पासून बिल एन्ड किप नियम लागू होणार आहे. त्यामुळे आययूसी चार्ज संपणार आहे. सप्टेंबर 2019 मध्ये आययूसी चार्ज आकारायला सुरूवात केली होती. त्यानंतर जिओने ज्यावेळी ट्राय आययूसी चार्ज संपवेल तेव्हा आम्हीही युजर्सकडून आययूसीचार्ज आकारणार नाही असं स्पष्ट केलं होतं. आता ट्रायने १ जानेवारीपासून आययूसी चार्ज न आकारण्याचं जाहीर केलंय. त्यानुसार जिओनेही ग्राहकांना पुन्हा एकदा विनामुल्य कॉलिंगची सेवा मिळेल असं स्पष्ट केलं.

हेही वाचा – आजीसोबत गावी जाताना देवगडमधील 8 वर्षांच्या मुलावर काळाचा घाला

सध्या जिओकडून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययूसी चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला 14 पैसे आकारत होती, नंतर 7 पैसे आकारले जात होते. पण आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे. त्यामुळे आता जिओ ग्राहकांना मोफत कॉलिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा – ‘ते’ 15 कलाकार ज्यांनी 2020मध्ये घेतला जगाचा निरोप

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!