‘स्वयंपूर्ण’ होण्यासाठी गोवा सज्ज

या प्रकल्पाअंतर्गत सरकारी अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण भागांत जाउन ते लोकांना कृषी उत्पादने घेण्यासाठी प्रोत्साहित करतील.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी गोवा सरकारने कंबर कसली असून ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात सादरीकरण करण्यात आले.
या प्रकल्पाअंतर्गत सरकारी अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण भागांत जाउन ते लोकांना कृषी उत्पादने घेण्यासाठी प्रोत्साहित करतील. पशुखाद्य गोव्यातच तयार व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न राहतील. 2 ऑक्टोबर रोजी या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.