EPFO चा मोठा निर्णय! नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची गरज नाही, वाचा नवा नियम

बोर्डाने सेंट्रलाइज आय सिस्टिमला मान्यता दिली; या अंतर्गत जुने पीएफ खाते नवीन खात्याशी जोडले जाईल

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता नोकरी बदलल्यानंतरही पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची गरज भासणार नाही. कारण जुने पीएफ खाते नवीन खात्याशी आपोआप लिंक केले जाईल. शनिवारी झालेल्या ईपीएफओ (EPFO)च्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बोर्डाने सेंट्रलाइज आय सिस्टिमला मान्यता दिली आहे. या अंतर्गत जुने पीएफ खाते नवीन खात्याशी जोडले जाईल. यापूर्वी कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे ट्रान्सफर करावे लागत होते, पण आता या प्रणालीद्वारे पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर होणार आहे.

नवीन खात्यात पीएफचे पैसे सहज जमा होतील

या प्रणालीमुळे जुन्या खात्यातून नवीन खात्यात पीएफचे पैसे सहज जमा होतील, असे बोर्डाच्या बैठकीत सांगण्यात आले. तुम्हाला फक्त एक यूएन (UN) क्रमांक द्यावा लागेल. यापूर्वी सेंट्रलाइज आय सिस्टीम नव्हती, तेव्हा कर्मचारी इच्छा नसतानाही पीएफचे पैसे काढायचे किंवा हस्तांतरित करायचे, त्यात कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची बैठक

कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची बैठक झाली. यामध्ये पीएफवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबाबतही निर्णय होणे अपेक्षित होते, पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. सध्या पीएफवर वार्षिक ८.५ टक्के व्याजदर आहे.

ईपीएफओची बैठक

अनेक महत्त्वाच्या बाबी ठरवायच्या असल्याने शनिवारी (२० नोव्हेंबर) होणाऱ्या बैठकीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. किमान पेन्शनची रक्कम आणि पीएफचे व्याजदर वाढविण्यावरही चर्चा सुरू आहे. याशिवाय, या बैठकीत ईपीएफओच्या वार्षिक ठेवींपैकी ५ टक्के रक्कम इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इनव्हिटसह (InvITs) पर्यायी गुंतवणुकीत गुंतविले जातील, असेही सांगण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!