60 वर्षांवरील लोकांना ‘एफडी’वर 6.30% व्याज

‘या’ दिवसापर्यंत लाभ घेण्याची संधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः कमी व्याजदराच्या या काळात मुदत ठेवी अधिक परतावा देण्याचा पर्याय असल्याचे सिद्ध होत नाहीये. परंतु ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि तरलता लक्षात घेता, बचत करण्यासाठी एफडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अशा परिस्थितीत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली होती.

हेही वाचाः जुनी स्क्रॅप करा, नवीन गाडी घेताना नोंदणी शुल्क माफ !

एफडी योजनेचा कालावधी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला

स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँका आहेत. या बँकांनी वरिष्ठ नागरिक विशेष एफडी योजनेचा कालावधी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला. आयसीआयसीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्या विशेष एफडी योजनेची मुदत 07 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवली आहे.

हेही वाचाः जीएमसी डीन नियुक्तीवरून मतभेद

तर त्यांना अधिक व्याज मिळण्याची संधी

सातत्याने कमी होत असलेला व्याजदर पाहता या बँकांनी गेल्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली होती. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या योजनांमध्ये निर्धारित कालावधीपूर्वी 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक केली तर त्यांना अधिक व्याज मिळण्याची संधी मिळेल.

‘एसबीआय’ची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना

देशातील सर्वात मोठ्या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना ठेवलीय. वी केअर – ज्यावर 30 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.30 टक्के अधिक व्याज उपलब्ध आहे. हे व्याज 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी केलेल्या एफडीवर उपलब्ध असेल. सध्या एसबीआय आपल्या सामान्य ग्राहकांना 5 वर्षांच्या एफडी वर 5.40 टक्के दराने व्याज देत आहे. परंतु जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 5 वर्षांसाठी एफडी केली तर त्याला 6.20 टक्के दराने व्याज मिळेल.

हेही वाचाः आधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही !

आयसीआयसीआय बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना

या खासगी क्षेत्रातील बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी या विशेष एफडी योजनेला आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स एफडी योजना असे नाव दिले आहे. आयसीआयसीआय बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.80 टक्के जास्त व्याजदर देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या कालावधीसह एफडीवर वार्षिक 6.30 टक्के दराने व्याज देत आहे.

हेही वाचाः हवाई प्रवास आजपासून महागला

एचडीएफसी बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना

एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी देऊ केलेल्या या योजनेचे नाव ‘एचडीएफसी सीनियर सिटीझन केअर’ आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर 0.75 टक्के जास्त व्याज मिळते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एचडीएफसी बँकेत या ऑफरची निवड केली तर त्याला वार्षिक 6.25 टक्के व्याज दर मिळेल.

हेही वाचाः तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर थांबेल कायमचा.. येतेय ‘शेवंता’..

बँक ऑफ बडोदाची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना

बँक ऑफ बडोदा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेंतर्गत 100 बेसिस पॉइंट जास्त व्याजदर देत आहे. या योजनेंतर्गत जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 5 ते 10 वर्षांसाठी एफडी केली, तर त्याला वार्षिक 6.25 टक्के दराने व्याज मिळेल.

हा व्हि़डिओ पहाः POLITICS | CONTROVERSY | बाबू आजगावकरांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!